गिरीश बापट यांच्या भाजप प्रचारासंदर्भात शरद पवार यांच सूचक विधान , त्यांची प्रकृती पाहता….

गिरीश बापट यांच्या भाजप प्रचारासंदर्भात शरद पवार यांच सूचक विधान ,  त्यांची प्रकृती पाहता….

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Bypoll Election) भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. कसबा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी तयारीला सुरुवात केली आहे.कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून भाजपच्या विरोधात तगडं आव्हान उभं करण्यात आला आहे. म्हणूनच भाजपने सुद्धा त्यांची पूर्ण ताकद लावण्याचा निश्चय केल्यासारखे आढळले आहे. यासाठी भाजप कडून संपूर्ण जोर लावण्यात येतो आहे. तर या पार्श्वभूमीवर भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) हे आजारी असूनही कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. यामुळे भाजपवर सगळीकडून टीका केली जाते आहे. त्यात भाजपनं याचं समर्थन करताना देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः अशा शब्दांत बापट यांचं कौतुक केलं होत. तर आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यंदा कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. भाजप आपली पूर्ण ताकद लावणार असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून भाजपच्या विरोधात तगडं आव्हान उभं करण्यात आला आहे. आणि आतापर्यंत ब्राह्मण समाजाचा उमेदवार उभा राहायचा, त्यामुळे कसब्यात भाजपची सत्ता असायची. यावेळी उमेदवार ब्राह्मण समाजाचा नाही. म्हणून या वेळेस महाविकास आघाडीचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.पण या मध्ये भाजपने खासदार गिरीश बापट यांना मैदानात प्रचारासाठी उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे की त्यांना प्रचारात आणणं ही भाजपची गरज होती का? ठाऊक नाही. पण मी गिरीश बापट यांना भेटून आलो होतो, त्यांची प्रकृती पाहता त्यांच्या यातना वाढू नये हीच अपेक्षा आहे” असे शरद पवार यांनी सांगितलं आहे.

भाजप खासदार गिरीश बापट यांनी काल कसबा मतदार संघात भाजपच्या सभेला हजेरी लावली तसेच मतदारांना आवाहन करताना भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनाच बहुमतानं निवडून द्या असं आवाहनही गिरीश बापट यांनी केला होत. गिरीश बापट यांना व्हीलचेअरवरुन प्रचारार्थ मैदानात उतरवल्यानं भाजपनं याचा मोठा इव्हेंट केला. माध्यमांनीही त्यांना मोठी प्रसिद्धी दिली. पण यामुळे भाजपवर मोठ्याप्रमाणात टीका केली जात आहे.

हे ही वाचा : 

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रेतिक्रिया , आम्हालाही वाटत होतं …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version