शरद पवारांचं कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अल्टीमेटम

शरद पवारांचं कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना अल्टीमेटम

महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) सीमावादाचा प्रश्न वरचेवर चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके (Kannada Rakshana Vedike) या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचेप्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया आली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून (Maharashtra Karnatak Border issue) कर्नाटक सरकारकडून चिथावणीखोर कृत्य आणि वक्तव्ये होत असल्याने सीमावाद उफाळून आला आहे. कर्नाटकात महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ले झालेत तर महाराष्ट्रातील संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. येत्या २४ तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक (Marathi speaking) जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला.

“माझ्याकडे जी माहिती आली आहे ती अत्यंत चिंताजनक आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं की, बेळगावमधील स्थिती गंभीर असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात (Police deployment) करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनाची चौकशी केली जात आहे. निवेदन देण्यासाठी मज्जाव केला जात आहे,” असेही शरद पवार यांनी सांगितलं.

हे ही वाचा : 

Bigg Boss Marathi 4 : रोहित शिंदेने रुचिरा बरोबर असलेल्या नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Maharashtra and Karnataka Border Dispute पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या गाड्यांना फासलं काळं

Vedant Marathe Veer Daudale Saat मराठी चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतला फर्स्ट लुक अक्षय कुमारनं केला शेअर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version