उर्फीच्या वादात शर्मिला ठाकरेंची उडी

उर्फीच्या वादात शर्मिला ठाकरेंची उडी

सध्या महाराष्ट्रामध्ये उर्फी जावेद (Urfi Javed) आणि चित्र वाघ (Chitra Wagh) प्रकरण चांगलंच पेटल्याचं दिसून येत आहे. या वादावर अनेक नेत्यांनी या आधी वक्तव्य केलं होतं. उर्फीने काहीही करावं, पण सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालू नये असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. नंतर हे प्रकरण महिला आयोगाकडेही (Commission for Women) पोहोचलं आहे. तिथून हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं आहे. पोलिसांनी उर्फीचा जबाब नोंदवला आहे. आता शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उडी घेतली आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) एका कार्यक्रमात शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले. उर्फीच्या कपडे घालण्याच्या स्टाईलवर तुमची प्रतिक्रिया काय असे पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दोन वाक्यात अगदी मिश्कील पण जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘मी पूर्ण कपड्यात फिरते. बाकीच्यांचे मला माहित नाही.’ असं उत्तर देऊन त्या लगेच निघून गेल्या.

दुसरीकडे चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदसंदर्भातील भूमिकेवर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. “माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. तरिही मी त्याला घाबरत नाही. मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे. मला लोक विचारत आहेत की, चित्रा वाघ उठली की उर्फीवर बोलत राहते. पण मी उर्फीवर उठसूठ बोलत नाही. मला प्रश्न विचारले जात आहेत, म्हणून मी उत्तरं देते. सार्वनजिक ठिकाणी नंगटपणा नको, हा एकच मुद्दा मी मांडला आहे. या राज्यात एका आईचा आवाज चित्रा वाघने उचलला असेल तर त्यात वावगं काय?” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

हे ही वाचा:

नारायण राणेंच्या हस्ते G-20 परिषदेची सुरुवात

राशी भविष्य,१५ जानेवारी २०२३, आजचा दिवसातील घडणाऱ्या घडामोडी तुम्हाला …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर संजय राऊतांची टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version