काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांच्यात चुरस तर, राहुल गांधीच्या अध्यक्षपदावर टांगती तलवार

काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांच्यात चुरस तर, राहुल गांधीच्या अध्यक्षपदावर टांगती तलवार

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काही दिवसांतच नामांकनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. या काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची नावे आघाडीवर आहेत. तर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी या दोघांमध्ये चुरस असणार आहे, फक्त राहुल गांधी यांनी ऐनवेळी यात हस्तक्षेप केल्यास हा खेळ बदलू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

India vs Australia 1st T20 : उमेश यादवने ‘या’ दोन खेळाडूंचे वाढवले टेन्शन

शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात अशी दाट शक्यता समोर येत आहे. असे असले तरी यावर थरूर यांनी काही बोलण्यास नकार दिला आहे. नुकतंच थरूर यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची इच्छा गांधी यांच्याकडे व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. आपण कुठल्याही उमेदवाराचे समर्थन करणार नाही असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पारदर्शकपणे व्हावी असे मत थरूर काही माध्यमांसमोर म्हटले आहे.

राहुल गांधीच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाला पक्षातीलच नेत्यांचा विरोध

त्याचबरोबर येत्या १७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोनिया गांधीने त्यांना परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मागच्या काही दिवसांत पक्षांतर्गत कुरघोडी होत असल्याचं आपल्याला पहायला मिळालं होतं. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस आणि राजस्थान काँग्रेस कमिटीने राहुल गांधी यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. तर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही पूर्णपणे लोकशाही पद्धतीने होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्षातील कोणताही पदाधिकारी अध्यपदाची निवडणूक लढण्यास पात्र असल्याची माहिती पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आली आहे.

नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मंदिर आता २२ तास खुले राहणार

Exit mobile version