Congress : मल्लिकार्जुन खरगे यांच्या काँग्रेस सुकाणू समितीत शशी थरूर यांना स्थान नाही, समर्थकांची नाराजी

Congress : मल्लिकार्जुन खरगे यांच्या काँग्रेस सुकाणू समितीत शशी थरूर यांना स्थान नाही, समर्थकांची नाराजी

काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचा पहिलाच दिवस वेगवान घडामोडींचा राहिला. त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीच्या नव्या रचनेसाठी सर्व सदस्यांचे राजीनामे झाले. त्यानंतर तात्पुरती व्यवस्था म्हणून पक्षाच्या घटनेप्रमाणे सुकाणू समितीची रचना जाहीर करण्यात आली. पाठोपाठ गुजरात निवडणुकीच्या तिकीट वाटपासाठी स्क्रीनिंग कमिटीची बैठक झाली आणि लगोलग २९ नोव्हेंबरला खर्गेंचा पहिला दौरा गुजरातमध्ये असणार हेही जाहीर करण्यात आले.

हेही वाचा : 

विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री असल्यास राज्याचा नक्कीच फायदा होईल; रोहित पवार

अनेक मोठ्या चेहऱ्यांना जागा दिली

खरगे यांनी सुकाणू समितीत पक्षातील अनेक बड्या चेहऱ्यांना स्थान दिले आहे. आनंद शर्मा, रणदीप सुरजेवाला, अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी, अजय माकन, अंबिका सोनी, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, मीरा कुमार, प्रमोद तिवारी, सलमान खुर्शीद, राजीव शुक्ला, हरीश रावत यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. खरगे यांनी शशी थरूर यांना या समितीत स्थान दिलेले नाही. काँग्रेसच्या नव्या सुकाणू समितीमध्ये कोणत्या राज्याच्या नेत्याला स्थान देण्यात आले आहे, ते आम्ही तुम्हाला सांगतो.

काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या नव्या घटनेला डोळ्यासमोर ठेवून ही नवी सुकाणू समिती स्थापन केली आहे. काँग्रेसकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की ही सुकाणू समिती पक्षाच्या कलम XV(b) अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे, जी आता काँग्रेस कार्यकारिणीच्या जागी काम करेल.

Govardhan Pooja 2022 : गोवर्धन पूजेनिमित्त बनवा खास गोडाचं नैवेद्य,अगदी सोप्या पद्धतीत

काँग्रेस वर्किंग कमिटीची नवी रचना काँग्रेसच्या एका विशेष अधिवेशनात ठरण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी मार्च दरम्यान हे अधिवेशन होऊ शकतं. त्यात २५ पैकी ११ सदस्य निवडणुकीनं निवडले जातात का हे पाहावं लागेल. ही वर्किंग कमिटी बनेपर्यंत तूर्तास पक्षाचे महत्वाचे निर्णय सध्याची सुकाणू समितीच घेणार आहे. वर्किंग कमिटीत ११ सदस्य निवडून आलेले, १२ अध्यक्षांनी निवडलेले, एक अध्यक्ष, एक संसदीय पक्षाचा नेता असे एकूण २५ सदस्य असतात. सध्या सुकाणू समितीत तर सोनिया, राहुल, प्रियंका असे गांधी कुटुंबाचे तीनही सदस्य कायम ठेवले आहेत. नव्या वर्किंग कमिटीत काय होतं याची उत्सुकता असेल.

बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत जाऊन स्वाभिमानाशी तडजोड केली ; सुषमा अंधारे

Exit mobile version