spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘उध्दवजी,एकांतात दिलेला शब्द पाळत नाही…’ ट्विट द्वारे शीतल म्हात्रेचा ठाकरेंवर निशाणा, पहा काय म्हणाल्या

काही महिन्यापूर्वी शिवसेनेविरोधात (shivsena) बंड करून माजी नगरसेविका शीतल म्हात्रे शिंदे (Eknath Shinde) गटात सामिल झालेल्या. त्यानंतर ठाकरे यांच्या विरोधात असल्याने अनेक कारणांवरून त्या चर्चेत राहिल्या म्हात्रे यांनी नुकतेच आपल्या ट्विटर वरून एक ट्विट करत पुन्हा एकदा ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “उध्दवजी, (Uddhav Thackeray) एकांतात दिलेला शब्द आपण कधी पाळत नाहीतच, किमान जनतेला जाहीरपणे दिलेला शब्द तरी पाळा! मी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे असं २९जून२२ रोजी बोलला होता. आठवतं का? आज त्याला सहा महिने झाले, वर्ष संपायच्या आत वचनपूर्ती करा. बाळासाहेबांसारखे दिलेला शब्द पाळायला शिका.” अशा आशयाचे ट्विट म्हात्रे यांनी केलं आहे.

Narendra Modi मुळे व्यावसायिक भरभराट? Gautam Adani म्हणाले…

कोण आहेत शीतल म्हात्रे? (Sheetal Mhatre)

शीतल मुकेश म्हात्रे या मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका आहेत. दहिसर प्रभाग क्रमांक ७ येथून त्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. आता महापालिकेचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. म्हात्रेंकडे शिवसेनेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी होती. अलिबाग-पेण संपर्क संघटक म्हणूनही त्यांच्या खांद्यावर धुरा देण्यात आली होती.

हेही वाचा : 

शिंदे -ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांचा मोठा निर्णय ! मुंबई पालिकेतील सर्व पक्षांची कार्यालय सील

शीतल म्हात्रे या अभ्यासू आणि कार्यकुशल माजी नगरसेविका आहेत. पालिकेतील शिवसेनेची भूमिका त्या सातत्याने मांडत होत्या. त्या मीडियातील चेहराही आहेत. मात्र, त्यांना काही मर्यादा आहेत. त्या लोकप्रिय माजी नगरसेविका आणि शिवसेना पदाधिकारी असल्या तरी मुंबईतील संपूर्ण मतदारसंघावर प्रभाव पाडतील असं त्यांचं व्यक्तीमत्त्व नाही. त्या मुंबईत शिवसेनेचं प्रचंड नुकसान करतील असंही नाही. एवढंच काय संपूर्ण दहिसर परिसरातून शिवसेना हद्दपार करतील एवढंही त्यांची ताकद नाही. त्यांच्या शब्दाखातर शिवसेनेचे मुंबईतील पदाधिकारी, नगरसेवक फुटतील अशीही परिस्थिती नाही. त्यांचा प्रभाव केवळ त्यांच्या मतदारसंघापुरता आहे. त्यामुळे त्यांच्या पक्ष सोडण्याने शिवसेनेला फारसा फरक पडला.

Latest Posts

Don't Miss