spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विधानसभेत रंगला शेरोशायरीने माहोल, शिशे मे रहनेवाले घर मे कपडे नही बदला करता

यंदाचं हिवाळी अधिवेशन कर्नाटक सीमाप्रश्न, आंदोलन, घोषणाबाजी आरोप प्रत्यारो आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांनी गाजत आहेत. त्यात, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चालून जाण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

यंदाचं हिवाळी अधिवेशन कर्नाटक सीमाप्रश्न, आंदोलन, घोषणाबाजी आरोप प्रत्यारो आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांनी गाजत आहेत. त्यात, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर चालून जाण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंत्री सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर, संजय राठोड यांच्यावरही आरोप होत आहेत. यावरुन आता विधानसभेत शेरोशायरीतून जुगलबंदी पाहयला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही यात सहभागी झाल्याचं दिसून आलं.

३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीरपणे देऊन पदाचा दुरुपयोग करून निर्णय घेतल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची चौकशी करण्याची मागणी आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे अंबादास दानवे यांनीही सभागृहात केली. दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षांनी सत्तारांना लक्ष्य केलं आहे. या प्रकरणावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीकडून जोरदार आंदोलन देखील करण्यात आलं आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरील गंभीर आरोपावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर पलटवार केला होता. राजीनाम्याची मागणी होत आहे, यावर बोलताना, आम्ही सत्तार यांच्यासंदर्भातील प्रकरणाची माहिती घेऊ, विरोधी पक्षनेत्यांच्या प्रकरणाचीही माहिती घेऊ, असे म्हणत एकप्रकारे अजित पवार यांना लक्ष्य केलं होते

याप्रकरणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पलटवार करताना शायरी म्हटली. काही मंत्री तुरुंगात गेले तरी राजानीमे घेतले नाही पण आता बदनामी करत आहेत, शिशे के घर मे रहनवाले दुसरों के घर पत्थर नही फेका करते…. असा चित्रपटातील डायलॉग मुख्यमंत्री शिंदेंनी सभागृहात ऐकवला. त्याचवेळी, बाकावर बसलेल्या फडणवीसांनी त्याला जोडूनच आणखी एक शायरी सांगितली. “शीशे मे रेहनेवाले घर मे कपडे भी नही बदला करते” असं विधान फडणवीसांनी केलं. हे विधान ऐकून सर्वच सभासद हसू लागले. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही हसू अनावर झालं. “शीशे मे रेहनेवालो को कपडे बदलने की आवश्यता नाही फिर भी बदलते है वो,” अशी प्रतिक्रिया या विधानावर मुख्यमंत्री शिंदेंनी हसत हसतच दिली. एकंदरीत विधानसभेत शेरोशायरीने माहोल हास्यकल्लोळ झाल्याचा दिसून आला.

हे ही वाचा:

‘गायरान जमीन वाटप प्रकरणी’ मंत्र्याची चौकशी होईपर्यंत राजीनामा घ्या, अजित पवारांची जोरदार मागणी

Pune Covid News पुणेकरांनो सावधान! सिंगापूरहून आलेला प्रवासी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss