spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे व फडणवीस सरकारचे पुरुषप्रधान मंत्रिमंडळ स्त्रियांना का डावलतय? सुप्रिया सुळे यांचा सवाल

मुंबई : आज अखेर तब्बल 39 दिवसांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्पात एकूण 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपत घेतेली आहे. यात शिंदे गटाकडून 9 तर भाजपकडून 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मंत्रीपदासाठी पुन्हा जुन्या जाणत्यांना संधी देण्यात आली आहे. परंतु शिंदे व फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला संधी देण्यात आलेली नाही. यावर महिला नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

शिंदे गटात सहभागी झालेल्या यामिनी जाधव, लता सोनावणे तर भाजपकजून मंदा म्हात्रे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागले असं बोललं जात होते. पण अंतिम 18 मंत्र्यांच्या यादीत एकाही महिला नेत्याचा समावेश नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार पुरुषप्रधान असल्याची चर्चा रंगली आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले, ” राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत 18 मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे”,असे त्यांनी म्हटले.

पुढे सुळे यांनी म्हटले, “स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही”, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा :  

राज्याला केंद्राचा पाठींबा आहे, आम्ही काम करून विरोधकांना उत्तर देऊ ; मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Latest Posts

Don't Miss