आमच्या विकासकामांवर शिंदे – फडणवीस फोटो लावतात, आदित्य ठाकरेंचा आरोप

आमच्या विकासकामांवर शिंदे – फडणवीस फोटो लावतात, आदित्य ठाकरेंचा आरोप

सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. आज शिवसेनेचे नेते, आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनमधून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर आदित्य ठाकरे यांनी इकबाल सिंग चहल यांना पत्र पाठवले आहेत. या पत्रामध्ये निविदा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला आहे. तर ४०० किमीच्या रस्त्यांचा प्रस्ताव मांडला कोणी ? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

मुंबई महापालिकेतील निविदा प्रक्रियेवर आदित्य ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित करणारं पत्र पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लिहिलं आहे. या पत्रानंतर निविदा रद्द करण्याऐवजी BMC ने प्रेसनोट काढली. पण महापालिकेची मुदत संपलेली असताना प्रशासकाने हजारो कोटींची कामे मंजूर करणं योग्य आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. आगामी मुंबई महापालिका निवडणूक तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहरात कामांचा धडाका लावला आहे. पण निविदा प्रक्रिया कायद्याला धरुन नसल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्राच्या माध्यमातून खडे सवाल विचारले आहेत.

मुंबई महापालिकेत ठराविक लोकांनाच कंत्राटं दिली जातायेत. गद्दारांची टोळी पालिकेवर हात मारुन जाईल पण मुंबईचं नुकसान होईल. स्वत:ला विकलं ते पुरे झालं, आता मुंबईला विकू नका, अशी खरमरीत टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

हे ही वाचा:

Mumbai Coldest Temperature, मुंबईत हुडहुडी वाढली, पारा १३. ८ अंशावर घसरला

सॅमचे मागे लागण्याचे कारण आले समोर, दृश्यम २ अभिनेत्री इशिता दत्ताचे बोल्ड फोटो होत आहेत व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version