शिंदे, फडणवीस राज ठाकरे यांच्या मनात उद्धव ठाकरेंची दहशत – अंबादास दानवे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Opposition leader Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

शिंदे, फडणवीस राज ठाकरे यांच्या मनात उद्धव ठाकरेंची दहशत – अंबादास दानवे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Opposition leader Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या तिनही नेत्यांच्या मनात उद्धव ठाकरे यांची दहशत आहे, त्यामुळे हे महापालिका निवडणुकीत एकत्र येतील असं दानवे यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Davve) यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शुक्रवारी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर आगामी मुंबई महापालिकेसाठी हे तीन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात महायुतीचा प्रयोग होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली. याबाबत अंबादास दानवे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देताना तिनही नेत्यांना खोचक टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंची दहशत शिंदे, फडणवीस राज ठाकरेंच्या मनात असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हंटले आहे. उद्धव ठाकरेंची दहशत मनात असल्यानेच नव्या महायुतीचा प्रयोग सुरू असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हंटलं आहे. दरम्यान राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही दानवे यांनी केली आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

तसेच या तिंघाना लोक मोठे नेते का म्हणतात हेच मला कळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एक जण चाळीस आमदार घेऊन बाहेर पडला. यात कसला आला मोठेपण याला गद्दारी म्हणतात असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. दरम्यान एकाचा तर एकही आमदार या महाराष्ट्रात नाही असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. तसेच फडणवीस हे तर मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले मग त्यांना मोठं म्हणायचं का असा सवाल दानवे यांनी केला आहे.

हे ही वाचा:

इस्रोचे सर्वात वजनदार रॉकेट नवीन मिशनसह बाजारपेठेत प्रवेश करणार; कसे आहे हे शक्तिशाली रॉकेट?

Viral Video : व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल; हत्तीने नक्की काय केलं ‘ते’ तुम्हीही पाहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version