spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे सरकारचा सत्तेत येताच अजित पवारांना दणका; 941 कोटीच्या कामांना स्थगिती

नगर विकास भागातील 941 कोटीच्या कामांना तूर्तास स्थगिती

मुंबई : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना चांगलाच दणका दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी नगर विकास भागातील 941 कोटी कामं कामांना तूर्तास स्थगिती दिली आहे. या प्रकरणी बारामती नगरपरिषदेला निधी मंजूर करण्यात आला होता. ही सर्व कामे मार्च 2022 ते जून 2022 या कालावधीत मंजूर करण्यात आली होती.

हेही वाचा

‘हीच ती वेळ’ आदित्य ठाकरेंचे युवासेनेला आदेश

शिंदे सरकारने फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी आमदारांच्या कामांना स्थगिती दिली आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना आमदारांनी सूचवलेल्या कामांना विरोध केलेला नाही. ९४१ कोटींपैकी एकट्या बारामती नगरपरिषदेला २४५ कोटींचं वितरण करण्यात आलं होतं. या आधी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी दिला जात नसल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे शिंदे सरकारने सत्तेत आल्यावर लगेच कामांना स्थगिती देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

बारामतीतल्या कामांना स्थगिती दिल्याने शिंदे सरकार कडून अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या आधीही अजित पवारांच्या कामांचा निधी शिंदे सरकार कडून रोखण्यात आला होता. तब्बल 13 हजार 340 कोटींचा हा निधी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागासाठी मंजूर केला होता. पण, नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत हा निधी दिला जाणार नाही, असं शिंदे सरकारने स्पष्ट केलं होतं.

 

Latest Posts

Don't Miss