शिंदे सरकारचा शिवसेनेला धक्का, निवडणुकीसाठी महापालिका प्रभाग रचना 2017 प्रमाणेच होणार

शिंदे सरकारचा शिवसेनेला धक्का, निवडणुकीसाठी महापालिका प्रभाग रचना 2017 प्रमाणेच होणार

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. नवं सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे सरकार सातत्याने ठाकरेंना धक्का देत आहे. अशातच आता शिंदे सरकारने मविआला आणखी एक मोठा धक्का दिला असून आता 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मविआ सरकारच्या काळात वाढवलेली वॉर्डरचना रद्द करण्यात आली असून यामध्ये मुंबईतील वाढलेल्या 9 वॉर्डचा समावेशही आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : 

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी नंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले, शिवसेनेने भगवा रोवलाय…

मुंबई महापालिकेची सदस्य संख्या 227 आहे. त्यानंतर ही संख्या वाढून 236 करण्यात आली होती. यात अनुसूचित जातीसाठी 15 वॉर्ड तर अनुसूचित जमातीसाठी 2 वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. तर महिलांसाठी 109 वॉर्ड आरक्षित आहेत. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या महापौर तर इक्बाल सिंह चहल हे महापालिकेचे आयुक्त आहेत. मात्र, सध्या महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आल्याने चहल हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. प्रभाग क्रमांक 200 मध्ये 2017 ला शिवसेनेच्या उर्मिला पांचाळ निवडून आल्या होत्या. परंतु शिंदे सरकारच्या नव्या निर्णयामुळे शिवसेनेला पुन्हा एकदा अस्वस्थ होणार असल्याचे दिसेल.

शिवाजी महाराजांच्या मूर्तीमुळे अडवले जायचं तिरुपतीत टोलनाक्यावर; मिलिंद नार्वेकरांनी घेतली दखल

Exit mobile version