spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

छगन भुजबळांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गट आक्रमक, भुजबळांच्या वक्तव्यामुळे वाद वाढण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदार संघातील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.

नाशिक लोकसभा मतदार संघातील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. राज्यात दररोज नवनवीन राजकीय भूकंप घडत आहेत. त्यातच आता छगन भुजबळांनी केलेल्या दाव्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. राज्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. उमेदवारीसाठी मी मागणी केली नव्हती, पण दिल्लीच्या बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली,असे छगन भुजबळ म्हणाले. मात्र छगन भुजबळांनी केलेल्या दाव्यानंतर शिंदे गटाकडून (Shinde Group) तात्काळ प्रतिउत्तर देण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही शिवसेनेची नाशिकची (Nashik) जागा सोडणार नाही, असे आमदार संजय शिरसाट म्हणाले.

छगन भुजबळांनी केलेल्या दाव्यानंतर संजय शिरसाट म्हणाले, आता कुणाची उमेदवारी दिल्लीहून आली असे म्हणतात, याबद्दल आम्हाला कल्पना काहीच नाही. पण अशाप्रकारे कुणाला दिल्लीहून उमेदवारी मिळाली म्हणून उभे राहायचं सांगितलं असेल, तर ते समोर येईलच. पण, ती जागा आम्ही सोडणार नाही हे मात्र निश्चित आहे. जिथून एक माणूस दोन वेळा मोठ्या मताने जिंकून येतो, ती जागा काढून घेणे म्हणजे शिवसैनिकांचा अस्तित्व संपवण्याचा प्रकार आहे आणि असा प्रकार आम्ही होऊ देणार नाही. नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केला आहे. एक निश्चित आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेनेनेच लढवली पाहिजे असा आग्रह नाशिकच्या नागरिकांचा आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेला द्यावी किंवा शिवसेनेने सोडू नये यासाठी सर्व कार्यकर्ते आग्रही आहे. आम्ही देखील मुख्यमंत्री यांना याबाबत सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री यांनी देखील यावर आपण सकारात्मक विचार करू,असे संजय शिरसाट म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या लोकांची आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी होत आहे. अशावेळी राजकीय निर्णय घेण्यासाठी जो काही वेळ लागतो तो वेळ मुख्यमंत्र्यांना मिळत नव्हता. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्री चार ते पाच तास नॉट रिचेबल होते,असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

हे ही वाचा:

नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी मिळण्याची शक्यता; उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह..

‘मिर्झापूर’ चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss