spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे गटाचा शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा, दोन्ही गट आमने-सामने

नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून तेथे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा रंगलेला सामना पाहायला मिळालेला असताना इकडे मुंबईतही शिवसेनेचे हे दोन्ही गट मुंबई महानगरपालिकेच (Mumbai Municipal Corporation) आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला. शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयाचा शिंदे गटाने आज ताबा घेतला. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्या नेतृत्वाखाली माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav), माजी नगरसेविका शितल म्हात्रे (Shital Mhatre), माजी आमदार अशोक पाटील (Ashok Patil), युवा प्रमुख दिलीप नाईक (Dilip Naik) व अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेना कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये बसून विषयावर चर्चा केली. मात्र, यावर ठाकरे गटाने जोरदार आक्षेप नोंदवला आहे.

यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. “४० खोके एकदम ओक्के”, “आव्वाज कुणाचा? शिवसेनेचा”, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. बराच काळ हा गोंधळ सुरु राहिल्यानंतर अखेर पोलिसांनी दोन्ही गटांच्या नेत्यांना महापालिकेतून बाहेर काढलं. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले, “शिवसेनेचं कार्यालय हे बाळासाहेबांच्या शिवसेनचं कार्यालयं आहे. मुंबई महापालिकेवर हक्क बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अधिकार आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असून त्यांच्या संकल्पेननंच आम्ही काम करतोय. कित्येक वर्षे आम्ही या कार्यालयातून काम केलं आहे. त्यामुळं याचं महत्व आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही इतर लोकांना भीक घालतं नाही, ज्यांना आरोप करायचा आहे त्यांनी करत रहावं. आम्ही मुंबईचा विकास करुन दाखवू”

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले, “शिवसेनेचं कार्यालय हे बाळासाहेबांच्या शिवसेनचं कार्यालयं आहे. मुंबई महापालिकेवर हक्क बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अधिकार आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असून त्यांच्या संकल्पेननंच आम्ही काम करतोय. कित्येक वर्षे आम्ही या कार्यालयातून काम केलं आहे. त्यामुळं याचं महत्व आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही इतर लोकांना भीक घालतं नाही, ज्यांना आरोप करायचा आहे त्यांनी करत रहावं. आम्ही मुंबईचा विकास करुन दाखवू”.

हे ही वाचा:

Anil Deshmukh: तुरुंगा बाहेर येताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

PM Modi Mother Health मोदींच्या मातोश्री विषयी खासदार राहुल गांधींचे भावुक ट्विट

कल्याण डोंबिवली पालिकेच्या ठेकेदारानेंच केली वीज चोरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss