Monday, September 30, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुले खैरेंवर गुन्हा दाखल करण्याची शिंदे गटाची मागणी

काही दिवसांपूर्वी शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली त्यानंतर खरी शिवसेना कोणती यावरून दोन्ही गटात वाद पेटून निघाला आहे. काल निवणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला. त्यामुळे दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधतांना शिंदे गटाबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. यासाठी पोलिसात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच काल निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह गोतावले आहे. दोन्ही गटामध्ये टीकेची झोड उठली आहे. आज आनंद दिघे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना उलटं लटकवलं असते, असे खैरे म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावरून आता शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या खैरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे.

आज औरंगाबाद येथील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेत, चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असून, त्यांच्याबद्दल खैरे यांनी केलेले विधान चुकीचे असल्याचं शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे. त्यामुळे खैरे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी जंजाळ यांनी केली आहे.

हे ही वाचा:

IND VS SA: नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजीचा निर्णय

Shahid Afridi On Ind Vs Pak: ‘धोनीमुळे टीम इंडियाची विचारसरणी… ‘, वर्ल्ड कप मॅचपूर्वी शाहिद आफ्रिदीचं मोठं वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss