शिंदे गटाला आयोगाकडे जाण्याचा हक्क नाही – ठाकरेंची भूमिका

सध्या महाराष्ट्रात राज्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजेच ठाकरे गट यांच्या मध्ये सत्तासंघर्ष सुरु आहे.

शिंदे गटाला आयोगाकडे जाण्याचा हक्क नाही – ठाकरेंची भूमिका

मुंबई :- सध्या महाराष्ट्रात राज्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजेच ठाकरे गट यांच्या मध्ये सत्तासंघर्ष सुरु आहे. शिवसेना कोणाची यावरून हा सत्तासंघर्ष सुरु आहे.शिंदे गटाला आयोगाकडे जाण्याचा हक्क नाही अशी ठाम भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. उद्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटात सामन्याचा नवा अंक रंगणार आहे आणि म्हणूनच ही भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांना त्यांची त्यांची बाजू मांडण्यासाठी ८ ऑगस्ट पर्यंतची वेळ दिली होती परंतु आता सुप्रीम कोर्टानंतर आता दुसरा अंक उद्या पासून सुरु होणार आहे. दोन्ही गटांचा दुसरा अंक आता निवडणूक आयोगात रंगणार आहे. सुप्रीम कोर्टाची सुनावणी सुरू असताना आयोगानं निर्णयाची घाई करू नये अशी विनंती शिवसेनेनं केले आहे. शिंदे गटाचे जे लोक आयोगासमोर आले आहेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार, त्यामुळे त्यांना आयोगाकडे दावा करण्याचा हक्कच नसल्याचा शिवसेनेचा युक्तिवाद आहे. शिवसेना पक्षाचा इतिहास, पक्षासंदर्भातल्या घटना, गेल्या काही वर्षातल्या पक्षांतर्गत निवडणुकांचा इतिहास, त्या त्या पदांची जबाबदारी याचा गोषवारा निवडणूक आयोगाकडे सादर होणार आहे. आठ ऑगस्टपर्यंत दोन्ही बाजूंना आपापली बाजू मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिला होता. सुप्रीम कोर्टाने आयोगाच्या कार्यवाहीला थेट स्थगिती दिलेली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट यांच्या याचिकेवर न्यायालयात ८ ऑगस्ट रोजी महत्वाची सुनावणी हि होणार होती परंतु ती सुनावणी आता १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच १२ ऑगस्ट हा शुक्रवार आणि त्यानंतर न्यायालयाच्या काही सलग सुट्ट्यांमुळे सुनावणीत आणखी काही काळ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तातडीच्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात अर्ज करावा लागेल. मात्र त्यांची ही विनंती मान्य होईल का याकडं लक्ष लागलंय. मात्र, आता सुनावणी लांबल्यानं राज्य मंत्रिमंडळ विस्तारही लांबल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा :- 

जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती

Exit mobile version