शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १४ आमदारांना अपात्रतेची नोटीस

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत नाकारून मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या १४ आमदारांना शिंदे गटाकडून आपात्रतेची नोटीस पाठण्यात आली आहे.

शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १४ आमदारांना अपात्रतेची नोटीस

राज्यपालांच्या आदेशानुसार दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर काल विश्वासदर्शक ठरावही जिंकला आहे. १६४ मतं जिंकून नवीन सरकार स्थापनेवर शिक्का मोर्तब केला. तर महाविकास आघाडीला ९९ मतं मिळाली, तर तीन आमदार तटस्थ राहिले.

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीतशिंदे गटाकडून व्हीप जाहीर करण्यात आला होता. तो नाकारून मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या १४ आमदारांना शिंदे गटाकडून आपात्रतेची नोटीस पाठण्यात आली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ही माहिती दिली. याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रारही दाखल केली असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी आदित्य ठाकरे यांचे नाव यातून वगळण्यात आले आहे. इतर १४ आमदारांना शिंदे गटाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

Exit mobile version