spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उद्धव ठाकरेंच्या आरोपाला शिंदे गटाच्या आमदाराचं थेट आव्हान

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बुलढाण्यामध्ये शेतकरी मेळाव्या मधून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदार खासदार आणि नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतली आजवरची सर्वात मोठी बंडखोरी केल्यानंतर राज्यातलं उद्धव ठाकरे सरकार कोसळलं. ४० आमदारांना घेऊन शिंदेंनी भाजपाशी हातमिळवणी केली आणि राज्यात शिंदे गट आणि भाजपा युतीचं सरकार अस्तित्वात आलं. मात्र, तेव्हापासून हे ४० आमदार ४० खोके घेऊन फुटल्याचा आरोप सातत्याने ठाकरे गटाकडून केला जात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही हा मुद्दा वेळोवेळी उपस्थित केला आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये यावरून विरोधकांनी पायऱ्यांवर ‘खोके सरकार’ म्हणत आंदोलनही केलं होतं. या पार्श्वभूमीवर शनिवारी बुलढाण्यात उद्धव ठाकरेंनी सभेमध्ये शिंदे गटावर टीका केल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे.

बुलढाण्यात उद्धव ठाकरेंची शनिवारी जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीका केली. “काही जण ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यांना रेडे मी म्हटलेलं नाही. त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचं म्हटलं होतं. “तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ४० रेड्यांनी, गद्दारांनी त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल, तर जाहीर सांगावं की, ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केलं होतं.

 

यासंदर्भातमाध्यमांशी शी बोलताना संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे. “पहिली गोष्ट तर शेतकऱ्यांचा मेळावा म्हणून त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण जेवढ्या लोकांनी तिथे भाषण केलं, त्यातलं कुणीही शेतकऱ्यांविषयी बोललं नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा, दु:ख, अडचणी किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनानं काय करावं, यावर विरोधी पक्ष म्हणून ते काहीही बोलू शकले नाहीत. जे बोलले, त्यात खोके, बोके याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला विषयच नव्हता. त्यामुळे त्या शेतकरी मेळाव्यातून काही निष्पन्न झालं असं काही दिसलं नाही”, असं संजय गायकवाड म्हणाले.

हे ही वाचा : 

MS Dhoni , पांडे बंधू एकत्रित पार्टीमध्ये काला चष्मा या गाण्यावर थिरकले

‘केजरीवाल यांनी संपूर्ण देशात मुस्लिमांची बदनामी केली’, ओवेसींनी केजरीवालांना फटकारले

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss