शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; तातडीने मुंबईला रवाना

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडात साथ देणारे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Aurangabad MLA Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; तातडीने मुंबईला रवाना

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडात साथ देणारे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Aurangabad MLA Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. शिरसाट यांना सोमवारी दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. संजय शिरसाट यांना औरंगाबादहून उपचारासाठी मुंबईला आणण्यात आलं आहे.

संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर असून त्यांना माइल्ड अटॅक आला होता असं सिग्मा हॉस्पिटलच्या टाकळकर डॉक्टरांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होतं. औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू होते. त्यानंतर आता काही वेळापूर्वी त्यांना एअर अंबुलन्सने मुंबईला रवाना करण्यात आलं आहे. लीलावती रुग्णालयामद्धे त्यांच्यावर उपचार करण्यात येतील अशी माहिती मिळत आहे. काल दुपारपासून त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी तातडीने उपचारासाठी त्यांना मुंबईला रवाना करण्यात आले आहे. औरंगाबाद विमानतळावरून मंगळवारी सकाळी संजय शिरसाट एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी औरंगाबाद विमानतळावर संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याचवेळात संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयात जाणार आहेत.

संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम येथील आमदार आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरात शिरसाटदेखील सामील होते. शिवसेनेचे उमेदवार म्हणून सलग तीन वेळेस विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचा ४० हजार ७४७ मतांनी पराभव केला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडात त्यांचा सहभाग होता. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांचा समावेश होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर संजय शिरसाट यांनी शिवसेना नेतृत्वावर विशेषत: खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती.

हे ही वाचा:

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा कहर! रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरूप

Sanjay Raut : राऊतांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version