हिंगोलीत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पीकविमा कंपनीविरोधात शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर आक्रमक

यात आमदार संतोष बांगर यांचे कार्यकर्ते पीकविमा कंपनीच्या कार्यलयात वस्तूंची तोडफोड करताना दिसत आहे. तसेच अनेक कार्यकर्ते या कार्यालयातील खुर्च्या फेकताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हिंगोलीत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पीकविमा कंपनीविरोधात शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर आक्रमक

पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी हिंगोलीत पीकविमा कंपनीच्या (Insurance Company) कार्यलयात तोडफोड केली आहे. तसेच बोगस पंचनामे आणि बनावट सह्यांच्या वापर करून पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक पीडित शेतकऱ्यांनी नुकसानीच्या तक्रारी पिकविमा कंपन्याकडे दिल्या. परंतु पिकविमा कंपनीच्या वतीने परस्पर पंचनामे केले जात आहेत. तर बोगस पंचनामे तयार करून बनावट सह्या करत अहवाल दाखल केला जात आहे. या अहवालांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा अत्यल्प स्वरूपात दाखवले जात आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा नुकसान झालेले असताना पिकविमा कंपन्या बनावटपणा करत आहेत, असा आरोप करण्यात येत आहे.

हा प्रकार कळल्यानंतर शेतकऱ्यांनी आमदार बांगर
यांना हा सर्व प्रकार सांगितला आणि बांगर यांनी पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित केले. परंतु त्यांनी येण्यास टाळाटाळ केल्यामुळे अखेर आमदार बांगर यांनी थेट पीकविमा कंपनीचा कार्यालय गाठून कुणीच कर्मचारी न भेटल्याने कार्यालयाची तोडफोड केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

या व्हिडीओत संतोष बांगर हे देखील या कार्यलयातील फोन भिंतीवर आपटताना दिसत आहे.

दरम्यान, अद्याप या सर्व प्रकरणाबाबद पीकविमा कंपनीच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच यासंबंधित अद्याप तक्रार नोंदवल्याची कुठली माहिती देखील अद्याप मिळू शकलेली नाही. या घडलेल्या प्रकाराबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर म्हणाले आहेत की, संतोष बांगर यांनी जर तोडफोड केली असेल तर त्याचं मी समर्थन करणार नाही. मुख्यमंत्री या संदर्भात चौकशी करतील.

हे ही वाचा:

Chhagan Bhujbal : स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या संपत्तीबाबत भुजबळांनीच दिली माहिती! पाहा काय म्हणाले?

युक्रेनला नाटोमध्ये सामील करून घेतल्यास तिसरे महायुद्ध घडवू रशियन अधिकाऱ्याने दिला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version