हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट जाणार सुप्रीम कोर्टात?

शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट लवकरच सुप्रीम कोर्टात धाव घेणार...

हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट जाणार सुप्रीम कोर्टात?

शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी कोर्टाकडून मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार शिंदे गटाला कोर्टाचा निर्णय मान्य असल्याच सांगण्यात येत होतं. मात्र आता समोर येत असलेल्या माहितीनुसार दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट लवकरच सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची बाब समोर येत आहे. तसेच शिंदेगट उद्यापर्यंत याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

हायकोर्टाने शिंदे गटाचे म्हणणे ऐकले नाही. तसेच सदा सरवणकरांची याचिका ही आमची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याची होती. सदा सरवणकरांचे म्हणणे हायकोर्टाने ऐकून घेतले नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या सुप्रीम कोर्टात करण्यात येणाऱ्या याचिकेत आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे त्यामुळे आम्हाला शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा करण्याची परवानगी द्यावी, असे याचिकेत म्हटले आहे. तसेच ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील याचिकेत शिंदे गटाने केली आहे. हायकोर्टाच्या निकालाची अंतीम कॉपी हातात आल्यानंतर आज किंवा उद्या याचिका दाखल करण्यात येणार आहे.

शिवाजी पार्कवर यंदा शिवसेनेचाच दसरा मेळावा

ठाकरे यांनी शिंदे सरकार विरुद्धची पाहिली न्यायालयीन लढाई जिंकून मोठा विजय प्राप्त केला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटाला देण्याचा निर्णय हायकोर्टाने घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. २ ते ६ ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे.

हे ही वाचा:

‘फक्त परवानगीच मिळाली ना? मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं’, कोर्टाच्या निकालानंतर राणेंची बोचरी टीका

आम्हाला कोर्टाचा निकाल मान्य आहे, कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदेगटाची पहिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version