spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चंद्रकांत खैरेंच्या दाव्यानंतर शिंदे गटाने दिली पहिली प्रतिक्रिया

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने फडणवीस सरकारच्या काळात आमच्याकडे प्रस्ताव दिला होता. शिवसेनेचे जे शिष्टमंडळ आमच्याकडे आले होते त्यामध्ये एकनाथ शिंदे हे पण होते असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने फडणवीस सरकारच्या काळात आमच्याकडे प्रस्ताव दिला होता. शिवसेनेचे जे शिष्टमंडळ आमच्याकडे आले होते त्यामध्ये एकनाथ शिंदे हे पण होते असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांनी केला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत १५ आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा दावा शिवेसनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यानंतर शिंदे गटाने आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“शिंदे साहेब उद्धव ठाकरे यांच्या सांगण्याशिवाय एकनाथ शिंदे काँग्रेसकडे प्रस्ताव घेऊन जाऊ शकत नव्हते. पण सध्या ज्या काही चर्चा होत आहेत त्याविषयी आम्हाला माहिती नाही” असं मत शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी व्यक्त केलं आहे. पण असं साहस एकनाथ शिंदे कधी करणार नाहीत, लोकं वाटेल ते बोलतात, याविषयी मुख्यमंत्र्यांनाच विचारले पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.

हे ही वाचा :  Dasara Melava : CM शिंदेंच्या दसरा मेळाव्याचं पोस्टर आले समोर, आम्ही विचारांचे वारसदार…

“फडणवीस सरकारच्या काळात सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे शिष्टमंडळ आमच्याकडे आले होते” असा गौप्यस्फोट चव्हाणांनी केला होता. त्यालाच दुजोरा देत चंद्रकांत खैरे यांनी अजून वेगळा गौप्यस्फोट केला असून “एकनाथ शिंदे १५ आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यावेळी ते पृथ्वीराज चव्हाणांची मदत घेत होते पण ते शक्य झालं नाही. पण नंतर ते शिवसेनेच्या नेत्यांच्या निदर्शनास आलं. आज ते आम्हाला नावं ठेवतात पण त्यांनी सर्वांत आधी गद्दारी करणार होते” असं ते म्हणाले आहे. चंद्रकांत खैरे हे सध्या उद्धव ठाकरे यांचे ज्योतिष आहेत. ते चांगल्या प्रकारे भविष्य सांगतात. त्यांनी असे वक्तव्य करणं योग्य नाही, त्यांनी आता संजय राऊतांची जागा घ्यायला चालू केली आहे असा टोला गोगावले यांनी खैरे यांना लावला आहे.

चंद्रकांत खैरे काय म्हणाले होते –

शिवसेना आणि भाजपची युती असताना एकनाथ शिंदे यांच्यासह आलेल्या एका शिष्टमंडळाने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या याच दाव्याला आता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दुजोरा दिला आहे. एवढच नाही तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना आम्हाला काँग्रेसमध्ये यायचं असल्याचं म्हणत एकनाथ शिंदे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागे लागले असल्याचा नवीन दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना खैरे म्हणाले की, जी गद्दारी एकनाथ शिंदे यांनी केली आहे ती, यापूर्वी सुद्धा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. शिवसेनेचे १५ आमदार सोबत घेऊन काँग्रेसमध्ये जाण्यासाठी शिंदे यांनी खूप प्रयत्न केला होता. मात्र याबाबत शिवसेनेच्या काही नेत्यांना कुणकुण लागल्याने तो विषय थांबला होता. त्यामुळे आम्हाला तुम्ही काँग्रेससोबत गेल्याचं म्हणणारे शिंदे स्वतः काँग्रेससोबत जात होते त्याचं काय? असा टोलाही खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला आहे. यावेळी पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, एकनाथ शिंदे त्यावेळी शिवसेनेचे 15 आमदार घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते. याबाबत मला एकदा आमदार संजय शिरसाट म्हणाले होते की, त्याचं काही खरं नाही. शिंदे हे कधीपण कुठेही जाऊ शकतात. त्यामुळे यांच्या मनात आधीपासूनच पाप होते असेही खैरे म्हणाले.

हे ही वाचा:

Video Viral : भर गरबा कार्यक्रमात शिरलेल्या मुस्लिम तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण

LPG Cylinders: LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता वर्षाकाठी केवळ १५ सिलेंडर मिळणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss