शिंदे गटाचे शहाजी बापू आणि शीतल म्हात्रे यांची नव्या नावावर पहिली प्रतिक्रिया

शिंदे गटाचे शहाजी बापू आणि शीतल म्हात्रे यांची नव्या नावावर पहिली प्रतिक्रिया

शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाला पक्षाची नावे आणि चिन्हं देण्याची आजपर्यंतची वेळ निवडणूक आयोगाने दिली होती. त्यानुसार दोन्ही गटांनी आपापली नावे आणि चिन्हं दिली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. “बाळासाहेबांची शिवसेना” हे नाव मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आम्ही मागितलं होतं. निवडणूक आयोगाने तेच नाव आम्हाला दिलं आहे. त्यामुळे आता शिंदे गट नसून बाळासाबेबांची शिवसेना हा आमचा पक्ष असेल. परंतु, या नावाबाबत कोर्टात गेले नाहीत तर आम्हाला हे नाव कायमसाठी मिळेल. भविष्यात देखील आम्हाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल याची आम्हाला खात्री आहे. कारण हे चिन्ह फक्त पोटनिवडणुकीपुरते मिळाले आहे, अशी माहिती शिंदे गटाच्या शितल म्हात्रे यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आम्हाला दिलं आहे. हा निर्णय योग्य असून ४० आमदार आणि १२ खासदारांच्या भावनेचा निवडणूक आयोगाने विचार केला आहे. बाळासाहेब यांच्या विचारांची सर्व लोक आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मैत्री करत आहेत त्यामुळे मोठी तफावत पडत गेली. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं म्हणजे प्रमाणिक काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा विजय आहे, असे मत शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले आहे.

नावात आम्ही समाधानी आहोत. बाळासाहेबांची शिवसेना असंच आम्हाला नाव पाहिजे होतं आणि तेच नाव आम्हाला मिळालं आहे. याच नावाने आम्ही पुढे जाऊ. लोकांच्या मनातील नाव आम्हालं मिळालं आहे. आत कोणतंही चिन्हं मिळालं तरी हरकत नाही, असं शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांनी आपल्या चिन्हांचा आणि नावाचा पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी पक्षांच्या तीन नावाची आणि तीन चिन्हांच्या पर्यायाची नावं दिली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला.

हे ही वाचा:

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर

उद्धव ठाकरे गटाची नावावर आणि चिन्हावर प्रतिक्रिया; उषःकाल होता होता, काळरात्र झाली, आता आयुष्याच्या पेटवा मशाली

नवे चिन्ह आणि नव्या नावावर किशोरी पेडणेकर आणि सुष्मा अंधरेंची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version