संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीवर शिंदे सरकारच्या नेत्याची प्रतिक्रिया

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीवर शिंदे सरकारच्या नेत्याची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेमधील दरी वाढत चालली आहे. महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना काल शिवसेनेनं मोठी घोषणा केली आहे. आता शिवसेना संभाजी ब्रिगेड या संघटनेसोबत युती केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. की, “घोडा मैदान दूर नसून त्यासाठी सर्वच नेते आणि पक्ष प्रयत्न करत असून चार सहा महिन्यात होणाऱ्या नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल.” असे मत त्यांनी मांडले.

हेही वाचा : 

डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय, नीरज चोप्राचं सर्वत्र कौतुक

पुढे गुलाबराव पाटील म्हणाले,” ‘प्रत्येक पक्ष हा आपल्या परीने युती करण्याचा प्रयत्न करतोय मात्र शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत केलेल्या युतीमुळे शिंदे सरकारला याचा काहीही फरक पडणार नाही. विरोध करणे हे विरोधकांचे काम असून एकनाथ शिंदे सरकारने सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसह ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास यासारखे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले असून आगामी दोन वर्षात प्रलंबित कामे देखील शिंदे सरकार पूर्ण करणार. विरोधकांनी कितीही टीका केली मात्र जो काम करतो त्यालाच जनता नमस्कार करते.”असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना काढला आहे.

भाजप नेते सोमय्या यांचा आरोप – आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली 1000 कोटींचा घोटाळा

जनता ही काम करणाऱ्यांना महत्व देत असते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चांगलं काम सुरू आहे. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे युतीची आम्हाला कुठलीही फिकीर नाही, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

मदर तेरेसा यांची ११२ वी जयंती: जाणून घ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित खास गोष्टी..

Exit mobile version