आ. सुहास कांदेंच्या विरुद्ध पिंपळगाव टोल नाक्यावर शिवसैनिक आक्रमक

आ. सुहास कांदेंच्या विरुद्ध पिंपळगाव टोल नाक्यावर शिवसैनिक आक्रमक

आ. सुहास कांदेंच्या विरुद्ध पिंपळगाव टोल नाक्यावर शिवसैनिक आक्रमक

नाशिक : शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज आदित्य ठाकरे नाशिक येथील मनमाड मध्ये शिवसैनिक व जनतेसोबत शिवसंवाद साधणार आहेत. त्याचप्रमाणे शिंदे गटातील आमदारही महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान शिंदे गटातील आमदार सुहास कांदे व आदित्य ठाकरे मनमाड येथे दौरा करत आहेत. याचवेळी सुहास कांदे यांनी आपल्या सोशल मीडिया वरून पोस्ट शेअर करत “आमचं काय चुकले?” असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला. आदित्य ठाकरेची भेट घेणार असल्याचं कांदे यांनी म्हटले. परंतु भेटीपूर्वी आदित्य ठाकरेंच्या समर्थकांनी सुहास कांदे यांच्या गाडीचा ताफा पिंपळगाव टोल नाक्यावर अडवत घोषणाबाजी केली.

पिंपळगाव टोल नाक्यावर शिवसैनिक आणि आमदार सुहास कांदे हे आमने-सामने आले. कांदेविरोधात शिवसैनिकांनी मोठ्याने घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी सुहास कांदे यांचा ताफा अडवून गाड्या पुढे जाण्यास मनाई केली अखेर, पोलिसांना मध्यस्थी करत शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. नाशिक मध्ये शिवसैनिकांकडून सुहास कांदे यांचा निषेध केलेला पाहायला मिळाले. यादरम्यान सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंना भेटीचे आवाहन केले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले…

आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांच्या भेटीचे आवाहन स्वीकारत “चालेल, निश्चित भेटू त्यांनी मातोश्रीवर यावे, मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. मी काळाराम मंदिरात नेहमीच येतो. आताही दर्शनासाठी आलोय आता आपण मंदिरात आहोत त्यामुळे इथे राजकारण नको” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

हेही वाचा : 

राज ठाकरेंच्या सुपुत्राने केला दादर ते अंबरनाथ लोकल ट्रेन मधून प्रवास

Exit mobile version