Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळी सुरूच राहणार, मत्रीमंडळ बैठकीत निर्णय

महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांना बदलण्याचा सपाटाच शिंदे सरकारकडून लावला आहे. अश्यातच शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशयावरून महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी बंद होणार अशी चर्चा होती.

Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळी सुरूच राहणार, मत्रीमंडळ बैठकीत निर्णय

महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांना बदलण्याचा सपाटाच शिंदे सरकारकडून लावला आहे. अश्यातच शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशयावरून महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी बंद होणार अशी चर्चा होती. मात्र, या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे. शिवभोजन थाळी संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीमध्ये आज चर्चा झाली. शिवसेनेच्या पुढाकारानं मविआ सरकारनं सुरु केलेली शिवभोजन थाळी यापुढेही सुरु राहणार आहे. आज पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा : Shiv bhojan Thali : राज्यात शिवभोजन थाळी बंद होणार ?

ही थाळी बंद होणार अशी चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही थाळी सुरू राहिल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही थाळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीसांनी भुजबळांना दिलेला शब्द पाळल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा घेणार आढावा घेतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून शिवभोजन केंद्र चालकांना अनुदान दिले जात होते. ग्रामीण भागातील केंद्रचालकांना एका थाळीमागे ५० रुपये आणि शहरी भागातील थाळी चालकांना ३५ रुपये अनुदान देण्यात येत होते. दरम्यान, शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे-फडणवीस सरकारचा कयास आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती. या योजनेतंर्गत राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण मिळत होते. कोरोना काळात याची किंमत ५ रुपये करण्यात आली होती. या योजनेमुळे गरिबांना मोठा आधार मिळत होता.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात एक लाख ८८ हजार ४६३ एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.

हे ही वाचा:

World Tourism Day: जगासमोर पर्यटन व्यवसायाला सावरण्याचे नवे आव्हान!

Shinde vs Thackeray : ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर, शिंदे गटाने निवडणूक आयोगात धाव का घेतली?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version