आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षते वरून शिवसैनिक नाराज

आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षते वरून शिवसैनिक नाराज

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमख आदित्य ठाकरे यांचा आज रत्नागिरी दौरा पार पडणार आहे. पण त्या आधीच आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत मोठा हलगर्जीपणा समोर येत आहे. सृक्षारक्षक उपस्थित होते पण सुरक्षारक्षकांना गाडी उपलब्द नव्हती अशी माहिती मिळत आहे. आदित्य ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात अली आहे. इतर वेळी ज्या प्रकारे आदित्य ठाकरे यांच्या बरोबर सुरक्षा कवच असतो त्या प्रकारे रत्नागिरी येथे दिसला नाही. आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेल्या पोलीस तसंच सुरक्षारक्षकांना पोलिसांची गाडी असणं अपेक्षित असताना त्यांना खासगी गाड्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक शिवसैनिकांन मध्ये नाराजी आहे.

शिवसंवाद यात्रेचा ३ टप्पा आजपासून सुरु झाला आहे. आज शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे १२.४० च्या दरम्यान रत्नागिरी मध्ये उपस्थित झाले. या दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या स्वागता साठी अनेक शिवसैनिक रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले. पण काही प्रमाणात आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसल्यामुळे शिवसैनिकांन कडून नाराजी व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या यापूर्वीच्या दौऱ्यात पोलिसांचा फौजफाटा होता, परंतु रत्नागिरी दौऱ्यात सुरक्षारक्षकांना खासगी गाड्या देऊन त्यावर पोलीस असं लेबल लावण्यात आलं आहे.

बुलडाण्यात एसटी अपघातात तरुणाने गमावले हात

रत्नागिरी विमानतळावर आदित्य ठाकरे यांनी बोलतांना “सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. माझ्यासाठी शिवसैनिक पुरेसे आहेत,” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरीत दाखल झाल्यावर दिली. रत्नागिरी मध्ये शिवसेना मोठी पोकळीक पढल्याचे दिसत आहे म्हणून आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला सगळ्यांचे लक्ष आहे. जेष्ठ शिवसैनिक रामदास कदम, आमदार योगेश कदम, उद्या सामंत याच्या वर काय टीका करणार हे पाहण्यासारखं असेल. रत्नागिरी दौऱ्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची धोपेश्व्रर रिफायनरी समर्थक मोठ्या संख्येनी भेट घेणार आहेत. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचे पत्र राजापूरमधील शिवसैनिकच देणार आहेत. रिफायनरी समर्थक, विविध संघटना, संस्था आणि जमीन मालक घेणार आदित्य ठाकरे यांची भेट आहेत. वेदांता-फॉक्सकॉनप्रमाणे हा प्रकल्प बाहेर जाऊ नये, म्हणून शिवसेनेनी या प्रकल्पाला समर्थन करावे अशी मांडणार भूमिका आहेत.

Exit mobile version