spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवसेनेचे मुखपत्र सामन्यातून अमित शहांना सल्ला

शिवसेनेचे मुखपत्र सामन्यातून आजच्या अग्रलेखात केंद्रीय मंत्री अमित शाह यांना सल्ला देण्यात आला आहे. “अमित शाह आपण असंच बोलत राहा, मऱ्हाठा नक्की उठेल!”, असं म्हणत अमित शाह यांना बोलत राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. “शिवसेनेला गाडण्याची व उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्याची भाषा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. आता मुंबईवर ताबा मिळवायचाच. आता नाही तर कधीच नाही, असेही ते म्हणाले. शिवसेना फोडली कशासाठी? त्या विषाच्या  निमित्ताने वाचा फुटली. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होणे नाही, पण शिंदे गटाने तर सुंताच करून घेतली! मात्र अमित शाह यांनी हे असे बोलत राहावे. मऱ्हाठा नक्की उठेल!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

हेही वाचा : 

अरुण गवळीच्या पत्नीची सुटका नाहीच, ‘या’ प्रकरणी सत्र न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार

अमित शहा हे वारंवार शिवसेनेच्या बाबतीत ही अशी भाषा वापरतात. हा त्यांच्या मनातील महाराष्ट्राविषयीचा द्वेष आहे. खरं तर त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी सदैव कृतज्ञ राहायला हवे. केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. हा गौप्यस्फोट नसून सत्य आहे. असे या अग्रलेखात म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांसमोर त्यांनी बंद दाराआड भाषण केले. पण ते सार्वजनिक झाले. विषाला उकळी फुटावी असे त्यांचे वक्तव्य आहे. मुख्य म्हणजे त्यांचे भाषण हे कृतघ्नतेचे टोक आहे, असंही सामनात म्हणण्यात आलं आहे. त्यानंतर अमित शहा व भाजपचे ‘मिशन मुंबई’ काय आहे त्याचा भयंकर चेहरा उघडा पडला. अमित शहा व त्यांच्या लोकांनी अशा प्रकारची भाषणे पुनःपुन्हा करीत राहिली पाहिजेत. त्यातूनच जनमनाचा उद्रेक होईल. शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि राज ठाकरे यांना चुचकारून त्यांनी मुंबईवर नियंत्रण मिळविण्याचे ठरवले आहे, असं सामनातून अमित शाह आणि भाजपवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

अभिनेता आणि प्रभासचे काका कृष्णम राजू यांच्या निधनाने दक्षिण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली

बाळासाहेब ठाकरेंशी व त्यांच्या विचारांशी बेइमानी आहे. अमित शहा मुंबईत येऊन अशा विषाची पेरणी करतात व भाजपमधील ‘मऱहाठे’ त्यावर टाळय़ा वाजवतात. मात्र अमित शहांनी शिवसेना गाडण्याची व ठाकऱ्यांना धडा शिकविण्याची भाषा सतत करीत राहावे. असे सांगत शिवसेनेने खोचक सल्लादेखील सामनातून देण्यात आला आहे.

Pitrupaksh shradh 2022 :- जाणून घ्या… श्राद्धाचे अनेक प्रकार

Latest Posts

Don't Miss