रामदास कदम यांच्या विरोधात पुण्यात शिवसेना आक्रमक

रामदास कदम यांच्या विरोधात पुण्यात शिवसेना आक्रमक

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्याविरोधात पुण्यात शिवसेनेचं आंदोलन सुरु आहे. कदम यांच्या वक्तव्यांचा पुण्यात निषेध करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या जोरदार टीका केली होती. या सर्व प्रकरणावरून आता पाण्यात रामदास कदम यांचा फोटो गाढवावर लावून शिवसेनेकडून पुण्यात निषेद व्यक्त केला जात आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी रामदास कदम यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर कुठे रामदास कदम यांचा पुतळा सुद्धा जाळण्याचा प्रयत्न होत आहे.

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची महाराष्ट्रात निष्ठा यात्रा सुरु आहे. त्यात काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा रामदास कदम यांच्या मतदार संघात दापोलीमध्ये पार पडली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी गद्दार असा उल्लेख करत रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांचावर निशाणा साधला. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी रामदास कदमांनी सुद्धा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यामध्ये आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळात कशा नाही आल्या याचं आश्चर्य वाटतं. कुठेही गेल्या तरी त्या सोबत हव्यातच. माँसाहेब कधी कोणत्या कार्यक्रमात गेल्या नाहीत, व्यासपीठावर चढल्या नाहीत, अशी टीका यावेळी केली. यावरून शिवसेनेत राजकारण चांगलंच तापल्याच दिसत आहे. दापोलीत काल रामदास कदम यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी काही प्रमाणात तणावाचं वातावरण दापोलीत दिसून आले. तर आज पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

रामदास कदम यांना पक्षाने मोठे केले, परंतु त्यांनी पातळी सोडून पक्ष नेतृत्वावर टीका केल्याने त्यांच्याविरोधात पक्षातर्फे गुरुवारपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांनी सांगितले. त्यानंतर नाशिक (Nashik) शिवसेना (Shivsena) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. नाशिक शहरातील शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळ झालेल्या आंदोलनात रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या गद्दारांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा नाशिक शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

लालबागचा राजा मंडळाला मुंबई महापालिकेचा दणका, साडेतीन लाखांचा दंड आकारला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version