Uddhav thackeray live : विजय नेहमी सत्याचाच होतो

Uddhav thackeray live : विजय नेहमी सत्याचाच होतो

उद्धव ठाकरे

Dasara Melava : ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाई ठाकरे गटाला मोठा विजय प्राप्त झाला आहे. कारण हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान हे २ ते ६ ऑक्टोंबर पर्यंत वापरण्याची परवानगी दिली आहे.

गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेला दसरा मेळाव्याचा संघर्षाला अखेर पूर्णविराम लागला आहे.  एकनाथ शिंदेंनी बंड केले त्यानंतर शिवसेनेवर हक्क सांगत दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच घेणार असे प्रयत्न सुरू ठेवले. उद्धव ठाकरेंच्या गटांनी मुंबई महानगरपालिकेकडे एक महिन्यापूर्वीच परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र, पालिकेने कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करत परवानगी नाकारली त्यावेळी शिंदे गटाला बीकेसीचे मैदान उपलब्ध झाले. पण, उद्धव ठाकरेंना होल्डर ठेवले होते यानंतर उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली ज्याचा निकाल आज ठाकरे गटाच्या बाजूने लागला.

‘त्या’ फोटोवर श्रीकांत शिंदेंनी दिली प्रतिक्रिया म्हणाले, हे सगळं हास्यास्पद…

हेही वाचा :

‘फक्त परवानगीच मिळाली ना? मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं’, कोर्टाच्या निकालानंतर राणेंची बोचरी टीका

हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात शिवसैनिकांकडून आणि शिवसेना नेत्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे.  महिला शिवसैनिक ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत आहेत. तर, काही ठिकाणी गुलाल उधळून पेढे वाटले जात आहेत. अशातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसैनिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट जाणार सुप्रीम कोर्टात?

Exit mobile version