शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून ; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून ; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

शिवसेना फुटी नंतर शिंदे गट आम्ही खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहे. दोन्ही गटा मध्ये मोठा संघर्ष सुरु असतांनाच, आता भाजपा चे नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. दोन-अडीच वर्षांपासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो, हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असा गौप्यस्फोट पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

दोन अडीच वर्षापासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो. हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असे विधान पाटील यांनी यावेळी केलं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणेही महत्त्वाचे होते. शेवटी ती वेळ साधल्या गेली आणि आपले सरकार आणले, असा धक्कादायक खुलासा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मला जेव्हा पक्षाने पुण्यात पाठवले तेव्हा अनेकांनी मला नाव ठेवली होती. पण तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नका. मला पुण्यात पाठवताना दिल्लीत यासंदर्भात विचार करण्यात आला होता. शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला मोठं धाडसं लागतं. त्यामुळे आम्ही त्यांना अंतर जाणवू देणार नाहीत, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. गेले अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने आपण घेतलेल्या अनेक चांगल्या निर्णयांना स्थगिती दिली. आपण जे प्रकल्प सुरू केले, ते रद्द करण्याचे का त्यांच्या सरकाने केले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हे ही वाचा:

Pro Kabaddi 2022: प्रो कबड्डीचा आजपासून थरार, दबंग दिल्लीपुढे यू मुम्बाचे आव्हान

NCB ची मोठी कारवाई! NCB कडून आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश; १२० कोटींचं मेफेड्रोन जप्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version