सामानातून शिवसेनेने लगावला भाजपला टोला, आताही त्यांनी हिंदू मुसलमान हा खेळ…

सामानातून शिवसेनेने लगावला भाजपला टोला, आताही त्यांनी हिंदू मुसलमान हा खेळ…

काल मुंबईमध्ये हिंदू समाजाने जनआक्रोश मोर्चाचे (Hindu Jan Aakrosh Morcha) आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा धर्मांतरण आणि ‘ लव्ह जिहाद’ याच्या विरोधात होता आणि या संदर्भातून सरकारने कायदे काढावेत याची मागणी समाजाकडून करण्यात आली होती. तसेच या जनआक्रोश मोर्चामध्ये भाजप नेत्यांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. तर यावर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana) शिवसेना ठाकरे गटाने भाजपला टोला लगावला आहे. हिंदूंनी त्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी शिवसेना भवनाचा परिसर निवडला. याचा अर्थ एकच, आजही सकल हिंदूंसाठी शिवसेना व शिवसेना भवन हेच एकमेव आणि शेवटचे आशास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या आक्रोशाला नक्की न्याय मिळेल. शक्तिमान हिंदू महाशक्तीचे कान बधिर झाले असले तरी शिवसेना भवन हिंदूंच्या आक्रोशाची नक्कीच दखल घेईल, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाकडून ‘सामना’तून केंद्रातील भाजपा सरकारला टोला लगावला आहे.

आज शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Group) सामनातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. तसेच भाजपने या मोर्च्याच्या माध्यमातून हिंदू-मुसलमान हा खेळ सुरू केला असल्याचे सामनात सांगण्यात आले आहे. या संदर्भात सामनामध्ये असे लिहिले आहे की “पराभवाचे हादरे बसू लागले की, भारतीय जनता पक्ष त्यांचा हुकमी खेळ सुरू करीत असतो. आताही त्यांनी हिंदू-मुसलमान हा खेळ सुरू केला आहे. देशभरातील हिंदू अचानक खयात आला असून धर्मातरविरोधी कायदा, ‘लव्ह जिहाद’ अशा मुद्यांवर भाजपा व त्यांच्या मिंधे गटाने मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढला. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्याचे सांगितले गेले, पण आघाडीवर भारतीय जनता पक्षाचेच लोक होते. “आम्ही सगळे हिंदू म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहोत” असे या मंडळींनी जाहीर केले, पण हे मोर्चे व आंदोलन म्हणजे स्वतःच्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचाच प्रकार आहे, ” असे लिहीत शिवसेना ठाकरे गटाने सामनातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून भाजप सरकारला काही प्रश्न देखील विचारण्यात आले आहेत. सामनामध्ये असे लिहिले आहे की “महाराष्ट्रात व केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी वगैरे सरकार आहे. गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे. मग तुमचे हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे?” असा सवालही ठाकरे गटाने सामनातून भाजप सरकारला विचारला आहे.

Exit mobile version