शिवसेनेचा याकूब मेमनच्या थडग्याशी काही संबंध नाही – अरविंद सावंत

कालपासून संपूर्ण महाराष्ट्रमध्ये दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Memon ) थडग्याला कोणी सुशोभीकरण केलं यावर सत्ताहधारी आणि विरोधी पक्ष मध्ये आरोप आणि प्रत्यारोप होताना दिसत आहे.

शिवसेनेचा याकूब मेमनच्या थडग्याशी काही संबंध नाही – अरविंद सावंत

कालपासून संपूर्ण महाराष्ट्रमध्ये दहशतवादी याकूब मेमनच्या (Yakub Memon ) थडग्याला कोणी सुशोभीकरण केलं यावर सत्ताहधारी आणि विरोधी पक्ष मध्ये आरोप आणि प्रत्यारोप होताना दिसत आहे. मुंबईमध्ये साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्यात अली होती. या सर्व प्रकरणी आता राजकीय वर्तुळात वाद सुरु झाले आहेत. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊ आशिष शेलार यांना प्रति उत्तर दिले आहे. शिवसेनेचा या थडग्याशी काडीचाही संबंध नाही असे अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी पत्रकार परिषदेत (press conference) स्पष्ट केले आहे.

भाजप | आशिष शेलार पत्रकार परिषद

पत्रकार परिषदे मध्ये बोलताना अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार टीका केली आहे. शिवसेनेने कधीही या गोष्टीला समर्थन केले नाही आणि भविष्यात हि करणार नाही असे अरविंद सावंत यांनी म्हटले. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षावर मोठा प्रश्न उपस्थित केला कि, जेव्हा याकूब मेमनला फाशी दिली तर त्याचा मृतदेह परत का करण्यात आला. ओसामा बिन लादेनच जे अमेरिकेने केलं ते तुम्ही का केला नाही असा प्रश्न उपस्थितकेला आहे. शिवसेनेनी या सर्व गोष्टींची चौकशी करा अशी मागणी केली आहे . भारतीय जनता पक्ष जातीय तेड निर्माण करण्याचे काम करत आहे असा आरोप देखील अरविंद सावंत यांनी केला आहे.

राज्यसरकाचा किंवा पालिकेचा याच्याशी काडीचा हि संबंध नाही कारण जागा हि खासगी आहे. तक्रारदार तुम्ही आणि न्यायधीश पण तुम्हीच असा आरोप देखील अरविंद सावंत यांनी केला. अश्या खोटा बोलणाऱ्या माणसांपासून वाचुन राहा अशी विनंती अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट निवडणुकीला घाबरत आहे असा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला.

हे ही वाचा:

‘याकूबच्या कबरी’वरुन भाजप – शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु

देशद्रोही याकूब मेमनच्या वादग्रस्त कबरीवर कारवाई सुरु, सात वर्षांनी राजकारण तापलं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version