spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बारामतीत Ajit Pawar यांच्या फोटोला लावले काळे कापड, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचे प्रताप

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये (Mahayuti) काही आलबेल नसल्याचे चित्र सातत्याने दिसत आहे. महायुतीतील घटकपक्ष असलेल्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला (NCP) शिवसेना शिंदे गट (Shivsena) आणि भाजपच्या (BJP) काही नेत्यांकडून सातत्याने लक्ष करण्यात येत आहे. तसेच, महायुती सरकारने (Mahayuti Government) चालू केलेल्या योजनांच्या श्रेयवादावरूनही राष्ट्रवादी आणि शिवसेना, भाजपात वाद निर्माण होत आहेत. आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीतच (Baramati) शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने गणेशोत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरील अजित पवार यांच्या फोटोला चक्क काळ्या कपड्याणे झाकले आहे. यावरून बारामतीत महायुतीत तणाव निर्माण झाला असून पोलीस सतर्क झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे यांनी बारामतीतील शारदा प्रांगणामध्ये एकनाथ गणेशोत्सव साजरा केलेला आहे. या गणेशोत्सवाच्या मंडपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचेही फोटो त्यांनी लावले होते. मात्र अजित पवार यांनी बारामतीत सगळ्या गणेशोत्सवांना भेटी दिल्या. पण आपल्या गणेशोत्सवाला भेट दिली नाही, म्हणून सुरेंद्र देवरे यांनी त्यांच्या फोटोला काळे कापड लावले. या घटनेनंतर तणाव वाढताच पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतले.

महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अशी घटना घडल्याने पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना लगेच ताब्यात घेतले. दरम्यान याबाबत सुरेंद्र जेवरे यांनी सांगितले की, “एकनाथ गणेशोत्सव साजरा करत असताना मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आम्ही लोकाभिमुख कार्यक्रम ठेवले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती मध्ये दौरा होता. या दौऱ्याच्या दरम्यान अजित पवार यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या.अगदी छोट्या छोट्या तरुण मंडळाच्या गणपतीला देखील भेट दिली. मात्र आम्ही विनंती करूनही अजित पवार या मंडळाकडे फिरकले नाहीत. अजित पवार यांच्या कुटुंबातील सर्वांचे छायाचित्र या मंडळापुढे लावूनही कुटुंबातील हे कुणीही तिकडे फिरकले नाही. त्यामुळे आम्ही नाराजी व्यक्त केली,” असे देवरे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

Nagpur Hit and Run Case: Chandrashekhar Bawankule यांच्या परिवाराचा संबंध नाहीये मग लपवाछपवी का चाललीय? :Sanjay Raut

BJP चा अंतर्गत सर्व्हे आला समोर लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; Rohit Pawar यांचा दावा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss