महागाई विरोधात कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन

महागाई विरोधात कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन

कोल्हापूरमध्ये आज शिवसेनेचं महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेकडून विविध मागण्या धडक मोर्चामध्ये करण्यात आल्या. महागाईचा जोर, हजारी पार गेलेला गॅस, रेशन बचाव, अन्नधान्यांवरील जीएसटी बंद करा, आदी मागण्यांसाठी आज शिवसेनेकडून कोल्हापूरमध्ये धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता.

दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी रेशनचा अधिकार कायम ठेवण्यात यावा, रेशनसाठी उत्पन्नाची किमान मर्यादा २ लाख करण्यात यावी, उत्पन्नावर आधारित रेशन कार्ड बंद करू नयेत, केशरी कार्डावर गहू, तांदुळ, डाळ देण्यात यावी, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करा, दसरा, दिवाळीला रेशनवर खाद्यतेल, डाळ, साखर द्यावी, बायोमेट्रिक पद्धत बंद करा, रेशन प्रशासनातील भ्रष्टाचार आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

रेशन कार्डवर लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती डॉक्टर, वकील, स्थापत्य विशारद, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, तसेच व्यवसाय कर, विक्रीकर, प्राप्तिकर भरतात, याबरोबरच टॅक्सी व रिक्षा वगळून चारचाकी वाहने आहेत. कुटुंबात पेन्शनदार अथवा नोकरदार व्यक्ती आहे, ज्यांचे उत्पन्न ग्रामीण भागात ४५ हजारांपेक्षा जास्त, शहरी भागात ५९ हजारांपेक्षा जास्त आहे, त्यांनी या योजनेतून बाहेर पडावे, अशी शासनाची अपेक्षा आहे.

२० सप्टेंबरपासून कोकणकन्या एक्सप्रेस कात टाकणार

रेशनचा अधिकार कायम करावा यासह विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून सुद्धा २३ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दसरा चौकातून दुपारी बारा वाजता मोर्चा निघणार असल्याची माहिती प्राचार्य ए. बी. पाटील व डॉ. सुभाष जाधव यांनी दिली आहे.

 

हे ही वाचा:

मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकार स्थापन करणार नवी समिती; चंद्रकांत पाटील असणार अध्यक्ष

Mahesh Bhatt : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांचे गाजलेले वाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version