दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात धाव

दसरा मेळवावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात रस्सीघेच हि सुरु आहे. आणि आता वाद हळू हळू वाढत देखील चालला आहे. शिवसेना दसरा मेळाव्याचा (Shivsena Dasara Melava) वाद आता हायकोर्टात (Bombay High Court) पोहचला आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची हायकोर्टात धाव

दसरा मेळवावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात रस्सीघेच हि सुरु आहे. आणि आता वाद हळू हळू वाढत देखील चालला आहे. शिवसेना दसरा मेळाव्याचा (Shivsena Dasara Melava) वाद आता हायकोर्टात (Bombay High Court) पोहचला आहे. पूर्व परवानगी मागूनही पालिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सांगत शिवसेनेने (shivsena) हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. गणेशोत्सवापूर्वीच शिवसेने (shivsena) महापालिकेकडे मैदानासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी मैदानासाठी अर्ज दाखल केला. दोन्ही गटांच्या अर्जावर महापालिकेने कोणताही निर्णय घेतला नाही. शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. महापालिकेच्या जी-उत्तर प्रभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. आता, हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे.

शिवाजी पार्कचे मैदान दसरा मेळाव्यासाठी कोणालाही मिळणार नाही का? अशी चर्चा सुरु झाली आहे. पालिकेचा विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय समोर आला आहे. खरी शिवसेना कोणाची? हा निर्णय सध्या न्यायालयात प्रलंबित आहे, असं विधी विभागच मत आहे. त्यामुळे शिंदे किंवा ठाकरे या दोन्ही गटांना परवानगी देऊ नये, असा पालिकेचा अभिप्राय आहे. शिवाजी पार्क मैदानाच्या वापरासाठी करण्यात आलेल्या अर्जावर निर्णय का घेतला नाही, याची विचारणा करण्यासाठी मंगळवारी मिलिंद वैद्य, महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांनी जी-उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

मिलिंद वैद्य पुढे म्हणाले की, “शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळू नये यासाठी राज्य सरकारचा महापालिकेवर दबाव आहे. २२ ऑगस्ट रोजी अनिल देसाई यांनी पालिकेमध्ये दसऱ्या मेळाव्या संदर्भात परवानगी अर्ज दाखल केला होता. १ महिना उलटून गेल्याने शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार हा प्रश्न सर्वांचं पडला आहे. आज मिलिंद वैद्य यांनी विश्वास व्यक्त केला की दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. परवानगीसाठी मागणी करून १ महिना उलटून गेला, तरीही परवानगी नाही दिली. आम्ही आमची डोकी गरम करून घ्याची का? सरकार कायदा आणि सुवेवस्था बिघडण्याची वेळ पहात आहे का ? असा प्रश्न मिलिंद वैद्य यांनी विचारला. आधी शिवसेनेला दसऱ्या मेळाव्याची परवानगी २ ते ३ दिवसात मिळायची पण शिवसेना फुटीनंतर शिवसेनेला १ महिन्या पेक्षा अधिक कालावधी लागत आहे. मिलिंद वैद्य म्हणाले की, “महापालिकेला परवानगी द्यायची असो वा नसो, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार. उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी शिवसैनिक एकत्र जमतील आणि दसरा मेळावा पार पडेल.”

Exit mobile version