अनिल पराबांमुळेच शिवसेना फुटली, रामदास कदमांचा हल्लाबोल

तसेच आज (२० जानेवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनावणी पुढे ढकलत, पुढील सुनावणी ३० जानेवारीला होईल असा निर्णय दिला आहे.

अनिल पराबांमुळेच शिवसेना फुटली, रामदास कदमांचा हल्लाबोल

शिवसेना कुणाची? हा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. आज ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीनं महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. जवळपास चार तास चाललेल्या या सुनावणीनंतरही  शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना (Uddhav Thackeray)  मिळणार की शिंदेंना मिळणार? महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आज देखील मिळालं नाही. तसेच आज (२० जानेवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनावणी पुढे ढकलत, पुढील सुनावणी ३० जानेवारीला होईल असा निर्णय दिला आहे. अशातच शिवसेना हा पक्ष फक्त अनिल परबांमुळे फुटला आहे, असा आरोप आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना, रामदास कदम यांनी असं म्हटलं आहे की, उद्धव ठाकरेंना अनिल पराबांनी चुकीचे सल्ले दिले आहेत. त्यांनी केलेल्या या पापामुळे शिवसेनेचा सत्यानाश झाला आहे. शिवसेना फोडण्याचे पाप त्यांनी केले आहे. त्यांच्यमुळेच शिवसेना फुटली आहे, हे त्यांचच पाप आहे.

पुढे ते म्हणाले, यांच्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. मला जो त्रास झालाय, माझ्या मुलाला जो त्रास भोगावा लागलाय तो मी कधीच विसरणार नाही. दिवस बदलत असतात आणि आता ते दिवस तुम्ही भोगताय आणि अनुभवताय. तसेच शिंदे गटातील एकही आमदार फुटणार नाही आणि ठाकरे गटात परतणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

तसेच, गद्दार कुणी केली? असा सवालही त्यांनी ठाकरे गटाला केला आहे. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली आहे, ठाकरे गटाने राष्ट्रवादीकडे शिवसेना गहाण ठेवली आहे. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आणि त्यांच्या विचारांशी आम्ही नाही तर उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

शिवसेना कुणाची कुणाची? शिंदे आणि ठाकरे गटाने दिल्या प्रतिक्रिया

Swiggy ने घेतला मोठा निर्णय, ३८० कर्मचाऱ्यांना कामावरून टाकणार काढून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version