Thursday, July 4, 2024

Latest Posts

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : “अर्थ संकल्पातून महिलांचं सरकार असल्याची प्रचिती येते” शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शहा यांचे वक्तव्य

अर्थसंकल्पात महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण, विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजना...

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. आज विधिमंडळ दुसरा दिवस आहे. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला. साधारणतः महिला, शेतकरी व नोकरदार वर्ग अश्या काही मुख्य वर्गांना लक्ष करण्यात आले. सोबतच यात अनेक नवनवीन योजना सांगण्यात आल्या आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. हे शिनेसरकारचे (shivasena) शेवटचे बजेट आहे. यात ७६००० कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या पावसाळी अधिवेशनात हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै २०२४ रोजी सुरु करणार आहे. राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे.या अर्थसंकल्पावर शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अर्थसंकल्पात महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण, विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजना आणि मुलींचं शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ अश्या अनेक योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महायुती सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प महिला पूरक असल्याचे शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशिबेन शहा (sushiben shaha) यांनी म्हंटले.

महिला ही कुटुंबाचा आधार असते. अनेक महिला कुटुंबाला सांभाळत असतात. या महिलांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल आहे. यापूर्वी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एस टी बस प्रवासात ५०% सवलत दिली. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. महायुती सरकार महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार आहे. लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना महायुती सरकरने आणल्या आहेत. महायुती सरकार हे सर्व सामान्य जनतेच आणि महिलांचं सरकार आहे. याची प्रचिती आजच्या अर्थ संकल्पातून येत असल्याचे ॲड. सुशिबेन शहा यांनी सांगितले.

आमच्या लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांना स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल.. या योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून करण्यात येईल. मुलींना व्यावसयायिक कोर्सेससाठी फी मध्ये सवलत आणि २५ लाख महिलांना लखपती दिदीचा लाभ देण्याचा आमच्या सरकारचा मानस असल्याचे ॲड. सुशिबेन शहा यांनी सांगितले.

हे ही वाचा

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : PUNE HIT-AND-RUN या प्रकरणी विधानसभेत फडणवीसांचे भाष्य..

स्टेटबँक ऑफ इंडियाने SBI क्लार्क मेन्स एक्साम चे रिजल्ट जारी..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss