सामनातून शिवसेनेने भाजपवर साधला अप्रत्यक्ष निशाणा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित…

सामनातून शिवसेनेने  भाजपवर साधला अप्रत्यक्ष निशाणा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित…

यंदाच्या वर्षी भाजप सरकारकडून अनेक मान्यवरांना पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या मान्यवरांच्या यादीमध्ये दिवंगत नेते मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) आणि ओआरएसचे निर्मात दिलीप महालनोबिस (Dilip Mahalanabis) यांच्यासह अनेक मान्यवरांची नाव आहेत. भाजप सरकारने तब्बल १०६ पद्म पुरस्कार जाहीर केले आहे. यामध्ये ६ जणांना पद्मविभूषण, ९ जणांना पद्मभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यामध्ये १९ मान्यवर महिला आहेत. आणि २ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर आता या पद्म पुरस्कारांच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यीवर सावरकर (Swatantra Veer Savarkar) आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा उल्लेख करत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असेलेल्या सामनातून अनेक वेळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात असते. यावेळेस सुध्दा असेच काहीसे घडले आहे. सामनाच्या अग्रलेखातून स्वातंत्र्यीवर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत भाजप सरकारवर टीका करण्यात करण्यात आली आहे. तसेच पुरस्कारात जाहीर करण्यात आलेल्या मान्यवरांचा देखील या लेखामध्ये अप्रत्यक्षरित्या उल्लेख करण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखात लिहिण्यात आले आहे की “या वेळी तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व सावरकर यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपास वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो; पण ‘होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे.’ अशी गर्जना करून अयोध्या आंदोलनात प्राण फुंकणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र मोदी सरकारला विसर पडतो.” असे म्हणत सामनाच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपवर आणि मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

तर सामनाच्या अग्रलेखात मरणोत्तर पदमविभूषण पुरस्कार जर करण्यात आलेले मान्यवरांना मुलायमसिंह यादव यांनी ‘बाबरी मशीद’ संदर्भात केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनात लिहिले आहे की “मुलायम यांनी सांगितले की, ‘बाबरी मशीद वाचविण्यासाठी आणखी हिंदूंना गोळय़ा घालाव्या लागल्या असत्या तरी मागे-पुढे पाहिले नसते.’ मुलायम यांच्या अशा वक्तव्यानंतर भाजप व त्यांच्या परिवाराने मुलायमसिंग यांच्यावर हिंदूंच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, पण त्याच मुलायम यांना आता प्रखर हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणाऱ्या मोदी सरकारने ‘पद्म विभूषण’ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला.” असे लिहीत सामनातून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Budget 2023, २०२३-२४ ची अर्थसंकल्पना कोण सादर करणार? वेळ, तारीखसह जाणून घ्या सविस्तर माहिती

हिवाळ्यामध्ये डाळींबाचे आरोग्यदायी फायदे घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version