मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा, शिवसेनेचे अरविंद सावंत यांची मागणी

गणेश विसर्जनादरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मध्यरात्री दोन्ही गटात हाणामारी झाली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा, शिवसेनेचे अरविंद सावंत यांची मागणी

Arvind Sawant

गणेश विसर्जनादरम्यान शिवसेना आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मध्यरात्री दोन्ही गटात हाणामारी झाली. पहाटेपर्यंत दादर पोलीस स्टेशनबाहेर तणावाची स्थिती होती. पोलिसांनी शिंदे गटाच्या तक्रारीनंतर महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघांना अटक केली. त्यानंतर आज सकाळपासून शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी दादर पोलीस स्टेशनबाहेर जमू लागले. शिंदे गटाविरोधात आणि गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात का आला नाही, असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी दादर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना केला. यावेळी दादर पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात वाद झाला आणि शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी देखील झाली आहे.

हे ही वाचा : शिवसेना व शिंदे गटातील वादानंतर आज दादर पोलीस स्टेशनबाहेर राडा

सत्ताधाऱ्यांकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले की, गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेने केली. शिवसैनिकांविरोधातील कलम ३९५ नुसार गु्न्हे मागे घेईपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत. आमदार सदा सरवणकर यांच्याकडील पिस्तूलमधून गोळीबार झाला. मात्र, ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या म्हणी प्रमाणे तक्रार दाखल करायला आलेल्या आमच्या शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल झाले. सत्ताधाऱ्यांची ही गुंडागर्दी सहन केली जाणार नाही. गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. सरकारची गुंडगिरी सुरू राहिल्यास जुनी शिवसेना दाखवून देऊ असा इशारा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे. प्रभादेवीमध्ये मध्यरात्री शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. त्यानंतर पोलिसांनी पाच शिवसैनिकांना अटक केली आहे. त्यानंतर शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी दादर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सावंत यांनी केली.


राज्यकर्ते असलेल्या लोकांकडून चुन चुन के मारेंगेची धमकी दिली जाते, विरोधकांना संपवण्याची भाषा केली जाते. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसैनिक शांत आहेत. राज्यातील वातावरण बिघडू नये आम्हाला वाटते. मात्र, ही गुंडागर्दी सुरू राहिल्यास आम्ही जुनी शिवसेना काय आहे, ते दाखवून देऊ असा इशाराही सावंत यांनी दिला.

हे ही वाचा : प्रभादेवीत मध्यरात्री शिवसेना-शिंदे गटात जोरदार वाद, सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप

अरविंद सावंत यांच्यासह दादर पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, आमदार अनिल परब, आमदार सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, मिलिंद वैद्य यांनी धाव घेतली.

हे ही वाचा :

SIIMA पुरस्कार २०२२: टॉलीवुड विजेत्यांची संपूर्ण यादी पहा…

एमसीएच्या निवडणुकीत कसोटी पटू संदिप पाटील- राजू कुलकर्णी, पवार- शेलार काय करणार?

सोमवारपासून मुंबईसह ठाण्यात जोरदार पावसाचा अंदाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version