spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यातील अलका चौकात शिवसेनेच्या बॅनरने वेधले सर्वांचे लक्ष, उद्धव ठाकरेंसोबत आनंद दिघेंच्या फोटोची चर्चा

पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग हा अलका चौक (Alka Chowk) आहे. याच अलका चौकातील एका बॅनरने सर्वांचे लक्ष हे वेधून घेतले आहे.

पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग हा अलका चौक (Alka Chowk) आहे. याच अलका चौकातील एका बॅनरने सर्वांचे लक्ष हे वेधून घेतले आहे. हा बॅनर शिवसेनेचा आहे. आणि अलका चौकात आलेल्या सर्व नागरिकांचे लक्ष या बॅनरने स्वतःकडे वेधले आहे. शिवसेनेचा (Shiv Sena) हा बॅनर असून यावर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह आनंद दिघे (Anand Dighe) यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यातील मजकूरही लक्षवेधी आहे.

या बॅनरवर “माझा कट्टर शिवसैनिक आनंद दिघे” हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य तसेच “माझी जात-गोत्र-धर्म फक्त शिवसेना” हे दिवंगत आनंद दिघे यांचं वाक्य. अशी दोन कोट्स अर्थात अवतरण या बॅनरवर आहेत. तसेच “मा. उद्धवजी, अखंड महाराष्ट्र सदैव आपणासोबत” असा मथळा याला देण्यात आला आहे. शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी हा बॅनर लावला आहे. दरम्यान, शिवसेनेत मोठी फूट पडल्यानं सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. शिवसेनेतील या बंडाचे सूत्रधार तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते. उद्धव ठाकरेंचं सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिवसेनेतील फुटीमुळं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन गट पडले असून शिंदेंच्या बॅनरवर आता बाळासाहेब ठाकरेंसह केवळ आनंद दिघेंचा फोटो असतो. पण आता पुण्यातील या बॅनरमुळं नवी चर्चा सुरु झाली आहे.

हे ही वाचा:

INOX मध्ये विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी PVR भागधारक, कर्जदारांची ११ ऑक्टोबर रोजी घेणार बैठक

आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात मुख्यमंत्र्यांनी घेतले बाप्पाचे दर्शन

लाडक्या बाप्पाचं आज विसर्जन, मिरवणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss