spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सामनातून शिवसेनेचा भाजपला टोला, विधान परिषद निवडणुकीचे निकाल ही भाजप-मिंधे सरकारला चपराक …

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana) आतापर्यंत सत्ताधाऱ्यांना अनेकदा टोला लागवण्यात आला आहे. तर आता नुकताच लागलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालावर शिवसेनेने सामनातून भाष्य केले आहे. कारण या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. याचे कारण म्हणजे राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपला फक्त एकच जागा मिळाली आहे. म्हणूनच शिवसेनेने (Shivsena) सामनातून भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. विधान परिषद निवडणुकीचे निकाल ही भाजप-मिंधे सरकारला चपराक असल्याचं सामनातून म्हटलं आहे. पदवीधर-शिक्षकांनी दिलेला हा कौल म्हणजे महाराष्ट्राचे ताजे जनमानस आहे. त्याचबरोबर आणखी बरेच धक्के भाजप आणि मिंधे गटास पचवायचे आहेत”. असे शिवसेनेने सामनातून म्हंटले आहे.

शिवसेनेनं सामनात (Saamana) विधानपरिषद निवडणुकी संदर्भात म्हटले की “भाजपला पाच जागांपैकी कोकणातील एकाच जागी भाजपचा विजय झाला. पण ही जागा मिळण यात हे भाजपचे यश नसून त्यांचे कोकणातील उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे कर्तृत्व जास्त असल्याचे सामनात म्हटले आहे”. सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की “विधान परिषद निवडणुकांचे निकाल हे , महाराष्ट्राची मन की बात आहे. आणि यामध्ये पाच जागांपैकी फक्त एक जागा भाजपास मिळाली. यामध्ये भाजपचा व त्यांच्या मिंधे गटाचा सपशेल पराभव झाला. नागपूर शिक्षक, अमरावती पदवीधर, संभाजीनगर शिक्षक, नाशिक पदवीधर, कोकण शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका पार पडल्या. पदवीधर-शिक्षक म्हणजे संपूर्ण सुशिक्षित मतदार अशा निवडणुकीतून आपले प्रतिनिधी विधिमंडळात निवडून आयोग पाठवतो. या सर्व जागांपैकी कोकण शिक्षक मतदारसंघातच भाजपचा विजय झाला.” असे म्हणतात शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे.

सामनाच्या अग्रलेखात पुढे लिहिले आहे की, ” या पाच जागांपैकी कोकण मतदारसंघात (शिक्षक) भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे हे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा पराभव करून निवडून आले. बाळाराम पाटील हे शे. का. पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीत उभे होते. पण महाराष्ट्र विकास आघाडीने त्यांना पाठबळ दिले. तरीही कोकणातील शिक्षक मतदारांनी यावेळी वेगळा निकाल दिला. संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-मिंधे गटाची पिछेहाट होत असताना कोकणात हा एकमेव विजय त्यांना मिळाला. यात भाजपपेक्षा शिक्षक उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे कर्तृत्व जास्त. म्हात्रे हे काही मूळचे भाजपचे नाहीत. भाजपला रेडीमेड उमेदवार हाती लागले. ते जिंकले हा योगायोगच”. असे सामनाच्या अग्रलेखात लिहिले आहे.

हे ही वाचा : 

EXCLUSIVE,कोकणातून लोकसभेत कोण जाणार? राऊत,राणे,जठार की सामंत…

World Cancer Day 2023, जाणून घ्या कॅन्सरचा इतिहास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss