Sunday, September 29, 2024

Latest Posts

Shivsena : शिवसेना पक्ष चिन्हासाठीची लढाई अंतिम टप्प्यात, निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार

शिवसेना म्हटलं की डरकाळी फोडणारा वाघ, धनुष्यबाण चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरे हे अगदी पक्कं समीकरण आहे. मात्र, शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर बंडखोर शिंदे गटाने थेट पक्षावरच अधिकार सांगितला आहे. एवढंच नाही, तर खरी शिवसेना आम्हीच असून आम्हालाच पक्षाचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळावं असाही दावा निवडणूक आयोगाकडे करण्यात आला. याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला, तेथून ते प्रकरण घटनापीठाकडे गेलं आणि अखेर न्यायालयानेही हा निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचं म्हटलं. यानंतर आता शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जाते आहेत. शिवसेना पक्ष चिन्हासाठीची लढाई अंतिम आता टप्प्यात आली आहे.

हेही वाचा : 

Phone Bhoot : अखेर प्रतीक्षा संपली, कतरिना कैफचा ‘फोन भूत’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची आज कायदेशीर लढाई बाबत वकिलांसोबत महत्त्वाची बैठक आहे. आयोगात प्राथमिक रिप्लाय आज सादर करायचा की उद्या यावर बैठकीत विचार होणार आहे. आयोगामध्ये प्राथमिक रिप्लाय दिल्यानंतर कागदपत्र दाखल करण्यासाठी शिवसेना वेळ मागण्याची शक्यता आहे. जवळपास सहा ते सात लाख अॅफिडेव्हिट सादर करायचे असल्याने वेळ मिळावा ही विनंती आयोगाला केली जाणार आहे.

या दरम्यान अंधेरीची पोटनिवडणूक देखील जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन उद्या निघणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्यापासून सुरू होणार आहे. या काळात चिन्हाचा निर्णय काय होतो हे पाहणे म्हत्त्वाचे ठरणार आहे.

Ajit Pawar on Eknath Shinde : मेळाव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, काहींची भाषण नको इतकी लांबली

मात्र अजून दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीर होतानाची स्थिती आयोगाला कायम ठेवावी लागेल. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल, असा ठाकरे गटाचा दावा आहे.तर शिंदे गटाचा दावा आहे की, विधीमंडळ पक्षातला आमचा दावा आयोगासमोर पोहचला आहे.लोकसभा, विधानसभेत आमच्या गटाला अधिकृत मान्यता आहे. ठाकरे गट वेळकाढूपणा करुन चिन्ह टिकवू पाहत असलं तरी आमच्या तक्रारीची दखल घेत अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलंही जाण्याची शक्यता आहे.

टाईम महाराष्ट्र आयोजित ‘सुंदर माझा बाप्पा’ स्पर्धा २०२२ निकाल जाहीर

Latest Posts

Don't Miss