यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मोकळे?

दरवर्षी दसरा मेळावा म्हंटल कि शिवसेना आणि शिवाजी पार्क (Shivaji Park) प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतं. परंतु याच शिवसेनेच्या आमदारांचे आता दोन भाग झाले आहेत आणि शिंदे गट आणि ठाकरे गट असे हे दोन गट तयार झाले आहेत.

यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मोकळे?

दरवर्षी दसरा मेळावा म्हंटल कि शिवसेना आणि शिवाजी पार्क (Shivaji Park) प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतं. परंतु याच शिवसेनेच्या आमदारांचे आता दोन भाग झाले आहेत आणि शिंदे गट आणि ठाकरे गट असे हे दोन गट तयार झाले आहेत. यावर्षी शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन्ही गट दसरा मेळावा घेण्यासाठी अडून आहेत. त्यामुळे मुंबईतील (Mumbai) दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरे (Uddhava Thackeray) यांचा होणार की शिंदे गट (Shinde Group), यावरुन वाद सुरु आहेत. त्याचदरम्यान यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मोकळेच राहण्याची शक्यता देखील आता वर्तवली जात आहे. वादग्रस्त मुद्द्यामुळे शांतता सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मुंबई महापालिका शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांच्या अर्जाला नकार देण्याची शक्यता आहे.

सध्या दादर प्रभादेवी भागात दोन्ही गटांच्या वादांमुळे आधीच तणाव वाढला आहे, अशा स्थितीत दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याकरता दोन्ही गटांनी अर्ज दिले आहेत. मात्र, खरी शिवसेना कुणाची हा वाद न्यायप्रविष्ट असताना, कोणाच्याही अर्जावर निर्णय घेणे पालिका प्रशासनाला कठीण जाऊ शकते. त्यामुळे मुंबई पोलिसांशीही सल्लामसलत करुन शांतता सुव्यवस्थेच्या कारणास्तव महापालिका दोन्ही गटांना शिवाजी पार्क मैदानाची परवानगी नाकारु शकते. महापालिकेने अद्याप यावर अंतिम निर्णय घेतलेला नसून, सध्या जी नॉर्थ वॉर्ड प्रशासन याबाबत विधी खात्याचा सल्ला घेत आहे.

शिवसेना कुणाची हा न्यायप्रविष्ट असणारा वाद, तसंच सध्याची दादर प्रभादेवीमधील तणावाची स्थिती यांमुळे शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची भीती असल्याने कोणत्याही गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देऊ नये असे मत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या वर्तुळात व्यक्त केले जात आहे. शिवतीर्थावर परवानगी मिळावी यासाठी प्रशासनावर दोन्ही बाजूने दबाव निर्माण झाला आहे दादर इथल्या जी नॅार्थ या महापालिकेच्या कार्यालयाबाहेर राजकीय राडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन इथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परवानगी मिळेपर्यंत जी नॅार्थ ॲाफिसच्या बाहेर मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

PM Modi Birthday : ‘५६ इंच’ थाळी संपवा आणि जिंका ‘साडे आठ लाख’ रुपयांचं बक्षीस

नरेंद्र मोदी एक प्रभावशाली व्यक्तिमहत्व, वाचा प्रधान मंत्रींच्या संघर्षाचा प्रवास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version