शिवाजी पार्क Rahul Gandhi साठी नाही तर फक्त बाळासाहेबांच्या विचारांसाठी- Uday Samant

शिवाजी पार्क Rahul Gandhi साठी नाही तर फक्त बाळासाहेबांच्या विचारांसाठी- Uday Samant

दादर येथील शिवाजी पार्क या ठिकाणी भारत जोडो न्याय यात्रेची राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. याबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे मत व्यक्त केले आहे. शिवाजी पार्क हे ठिकाण बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारणसाठी असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले. यासोबतच, राहुल गांधी यांनी या सभेतून काय साधले? असा सवालही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एवढे सगळे पक्ष एकत्र येऊन देखील सभेसाठी गर्दी जमली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले उदय सामंत?

शिवाजी पार्क वरील सभा फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची प्रेरणादायी असायची.. “माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो” हे ऐकताच लाखो शिवसैनिक टाळ्यांनी प्रतिसाद द्यायचे..आत्ता सगळच बदललं..राहुल गांधीच्या भाषणात साहेबांचा उल्लेख नाही..ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान केला त्या राहुल गांधीने यांच्यासोबत जाऊन काय साधलं..ज्या लाखो शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या विचाराने शिवसेना वाढवली त्यांना काय वाटत असेल..काल सिद्ध झालं शिवाजी पार्क राहुल गांधी साठी नाही तर फक्त वंदनीय बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांसाठी आहे..आणि म्हणुनच  शिवाजी पार्क लाखो शिवसैनिकांनी फुलून जायचं त्याठिकाणी काल नैराश्य होतं..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एवढे सगळे पक्ष एकत्र येऊन देखील सभेसाठी गर्दी जमली नाही..कितीही अपशकुन करा “NDA महाराष्ट्रात ४५ पार आणि I.N.D.I.A देशातून हद्दपार”

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून नाराजी

भारतीय निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु, राज्यात जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नाही. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडे जागा वाटपावरुन चर्चा होताना दिसून येत आहे. त्यातच, दोन्ही आघाडीकडून मात्र काही जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून नाराजी पाहायला मिळत आहे. तर काही जागांबाबतचा पेच सुटण्याची शक्यता आहे. अशात, कोणाच्या वाट्याला किती जागा असणार यावरून वाद होताना दिसत आहे.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीचा नेमका फॉर्म्युला काय? ठाकरेंच्या वाट्याला किती जागा?

जरासा वेळ लागला पण मी आलो तर दोन्ही पक्ष फोडूनच आलो, उत्तर द्यावं लागतच पण, वेळ पाहावी लागते; देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version