शिवशक्ती आणि भीमशक्ती येणार एकत्र, रेखा ठाकूर यांची माहिती

शिवशक्ती आणि भीमशक्ती येणार एकत्र, रेखा ठाकूर यांची माहिती

शिवसेनेते पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि वंचित एकत्र येणार आहे. भाजपविरोधात ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडी युती करणार असून वंचितकडून यासाठी होकार देण्यात आल्याची माहिती वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे काही दिवसांपूर्वी एका मंचावर आले होते, त्यानंतर युतीच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांनी आज पत्रकार परिषदेत ( press conference) याची माहिती दिली. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

रेखा ठाकूर यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन (Abul Hasan) आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठका सकारात्मक झाल्या होत्या. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला युतीसाठी होकार कळवला असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र येण्याच्या भूमिकेमध्ये एकमतावर आले आहेत, आम्ही सकारात्मक आहोत. बोलणी पुढे गेली असून वंचितच्या तीन प्रतिनिधींची सुभाष देसांईंसोबत दोन बैठका घेतल्या आहेत. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. सुभाष देसाई दोन वेळा प्रकाश आंबेडकर यांना भेटले आहेत, त्यांच्यात देखील सकारात्मक चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमात भेटले त्यांच्यामध्ये देखील सकारात्मक चर्चा झाली असे रेखा ठाकूर यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी चर्चा करावी, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

अभ्यास करून ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा तयार केला, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version