सुनील महाराजांच्या हाती शिवबंधन, मंत्री संजय राठोड यांना धक्का

सुनील महाराजांच्या हाती शिवबंधन, मंत्री संजय राठोड यांना धक्का

एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर ठाकरे सरकारच्या कॅबिनेटमधील मंत्रिपदावरुन संजय राठोड यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर राठोड यांचा समावेश पुन्हा मंत्रिमंडळात व्हावा, यासाठी सुनील महाराजांनी मुंबईत अनेकांच्या राजकीय गाठीभेटी घेतल्या होत्या. त्यावेळी बंजारा समाजाच्या महंतांनीही आपली ताकद संजय राठोड यांच्या पाठिशी उभी केली होती. अखेर शिंदे गटात सामील झाल्यानंतर संजय राठोड यांना तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात क्लीनचिट मिळाली होती. याशिवाय, त्यांना पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात अन्न आणि औषध प्रशासन खाते देण्यात आले होते. परंतु, यानंतर महंत सुनील महाराज आणि संजय राठोड यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ असे म्हटले जाते. दसराजवळ आला असताना महंत शिवसेनेत आले आहेत. ज्यांना आम्ही न्याय दिला. त्यांनी पाठित खंजीर खुपसला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. दसऱ्यानंतर मी महाराष्ट्र दौरा करणार आहे. त्यादरम्यान पोहरादेवीलादेखील जाणार असल्याचे उद्धव ठाकरे सांगितले. लढताना जे सोबत येतात त्यांचे जास्त महत्व असते, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी दसरा मेळाव्याबाबत भाष्य केले. इतरांचेही दसरा मेळावे होतात. पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा होत असतो, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचा फक्त एकच दसरा मेळावा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे पंचमीच्या यात्रेच्या शुभदिनी मी आज शिवसेनेत प्रवेश करतोय. उद्धव ठाकरे यांनी मला शिवबंधन बांधलंय. बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिवसेनाच काम करु शकते, असा माझा दृढविश्वास आहे. ज्यांच्यासोबत आम्ही होतो, त्यांनी वेगळा मार्ग निवडला. पण सारासार विचार करुन मी शिवसेनेचा भगवा हाती घ्यायचा निर्णय घेतला. माझ्यासोबत शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करतायेत. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करु, असा निर्धार सुनील महाराज यांनी बोलून दाखवला.

हे ही वाचा:

IND vs SA: मोहम्मद सिराजचा टीम इंडियात समावेश; ‘या’ खेळाडूंची घेणार जागा

गुरुवारी होणार बुलेट ट्रेनच ठाणे जिल्ह्यात १०० टक्के भूसंपादन

Follow Us

 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version