Shivraj Patil : शिवराज पाटलांच्या वक्तव्यावरुन भाजपने केली जहरी टीका

कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Congress leader former Union Home Minister Shivraj Patil Chakurkar) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वादग्रस्त विधान माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटलांनी केलं आहे.

Shivraj Patil : शिवराज पाटलांच्या वक्तव्यावरुन भाजपने केली जहरी टीका

कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Congress leader former Union Home Minister Shivraj Patil Chakurkar) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वादग्रस्त विधान माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटलांनी केलं आहे. शिवराज पाटील यांनी गीतेची तुलना जिहादशी केल्याने आता राजकीय वाद हळू हळू पेटताना दिसत आहेत. शिवराज पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे

मोहसिना किडवई यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवराज पाटील यांनी बायबल आणि गीता यांची तुलना केली. पाटील म्हणाले की, महाभारत ग्रंथामध्ये सांगण्यात गीतेचा भाग समाविष्ट आहे. याच गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला जिहादच्या गोष्टी सांगत आहे.

हे ही वाचा :  श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, शिवराज पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले की, “शिवराज पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या काँग्रेसने रामाचं अस्तित्व नाकारलं, अल्पसंख्यांकांचं लांगुलचालन केलं, दहशतवादी आणि नक्षलवादी यांचं समर्थन केलं, त्या पक्षाचे नेते शिवराज पाटील यांच्याकडून अजून काय अपेक्षित आहे? त्यांचं डोकं सडलेलं आहे आहे. काँग्रेसची विचारसरणीच सडलेली आहे.”

भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी या सगळ्यांमध्ये इटालीयन विचारधारा रुजवण्यात आली आहे, कॉंग्रेसचे नेत्यांनी त्यांचे डिएनए इटालीयन करून घेतले आहेत. यापेक्षा दुर्देवी वक्तव्य कॉंग्रेसच्या नेत्यांकडून अपेक्षित नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या संस्कृती, दैवतांची विटंबना करण्याच्या वृत्तीची लाज वाटते असे ते म्हणाले आहेत.

तर शिवराज पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया देतान काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची लाज वाटते, जिहादचा खरा अर्थ संघर्ष आहे, स्वतःच्या शुद्धीसाठी केलेला संघर्ष याला देखील जिहाद म्हटले जाते. धर्माच्या अधर्माविरोधच्या लढाईला देखील जिहाद म्हटले जाते असे म्हटले आहे.

शिवराज पाटील यांनी गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केली. फक्त कुराण आणि बायबलमध्ये जिहाद नसून श्रीकृष्णही अर्जुनाला जिहाद सांगायचे, अशा आशयाचं वक्तव्य शिवराज पाटील यांनी केलं आहे. शिवराज पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरु होण्याची चिन्ह आहेत. “मनामध्ये कोणतीही किल्मिष नसतानासुद्धा एक मन सांगतं गोष्टी योग्य आहेत. तर दुसरं मन सांगतं गोष्टी अयोग्य आहेत. याच सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करताना जेव्हा शक्तीचा वापर करावाच लागतो, तेव्हा तो करावाच लागतो. हे फक्त कुराणमध्येच नाही तर गीतेमध्येही सांगण्यात आलेलं आहे.” श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे, असेही त्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

Diwali 2022 : राज ठाकरेसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील मनसेच्या दीपोत्सवासाठी येणार एकत्र

मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळी भेट; राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version