मला एकनाथ शिंदेंचा फोन म्हणाले… – शरद पोंक्षे

शरद पोंक्षे यांनी नुकतीच त्यांच्या नवीन पुस्तकाविषयी ची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यात त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले.

मला एकनाथ शिंदेंचा फोन म्हणाले… – शरद पोंक्षे
अभिनेते शरद पोंक्षे अनेक नाटक, मालिका, सिनेमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. हल्लीच त्यांनी कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराशी लढा दिला व पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ते सिनेसृष्टीकडे वळले. कॅन्सर सारख्या आजाराशी एक सामना करताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी एका पुस्तकात लिहून ते पुस्तक हल्लीच प्रकाशित केले आहे. या आधी ही शरद पोंक्षे यांनी एक पुस्तक लिहून प्रकाशित केलं आहे. शरद पोंक्षे यांनी नुकतीच त्यांच्या नवीन पुस्तकाविषयी ची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यात त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले आहेत.
गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकरणात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचं नावं अनेकदा घेतलं जातंय. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात मविआ सरकारवर संकट कोसळलं असल्याचं म्हटलं जातंय. त्यांच्यावर अनिकांकडून टीका केली जात आहे तर अनेक जण त्यांच्या बाजूने असल्याचं म्हटलं जातंय. त्यात अभिनेते शरद पोंक्षे यांनी इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर करत त्यात एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
शरद पोंक्षे यांनी आपल्या नवीन पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. सोबत एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत लिहिले, “कॅन्सर च्या काळात माझ्या पाठीशी उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, पुस्तकात त्यांनी केलेल्या मदती बद्दल सविस्तर लिहिलं आहे. हॉस्पिटल मध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. स्वतःची काळजी घ्यायची आणि लवकर बरे व्हायचं. सख्या भावाप्रमाणे ते माझ्यापाठीशी उभे राहिले.”
सध्या शरद पोंक्षे स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येतात.
Exit mobile version