एकनाथ शिंदे गटाचे नवीन नाव ठरले

एकनाथ शिंदे गटाने हालचाली सुरू करून एक निर्णय घेतला व आपल्या गटाचे नवीन नाव ठेवण्यात आल्याचे समजते आहे. 

एकनाथ शिंदे गटाचे नवीन नाव ठरले
महाराष्ट्रत सूरू असलेले राजकरण दिवसेंदिवस नवीन वळण घेत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे मागच्या दोन तीन दिवसात अनेक घडामोडी घडल्या आहेत. कालपर्यंत एकनाथ शिंदे ४० आमदारांचा गट घेऊन पुन्हा मुंबईत येण्याची शक्यता होती. पण असे घडताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रकारे एकनाथ शिंदे गटाला मुंबईत आणण्याचे प्रयत्न केले, पण तसे घडताना दिसत नसल्याने शिवसैनिकांनी बंडखोरी पत्करलेल्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यातच एकनाथ शिंदे गटाने हालचाली सुरू करून एक निर्णय घेतला व आपल्या गटाचे नवीन नाव ठेवण्यात आल्याचे समजते आहे.
कालपर्यंत हा गट पुन्हा मुंबईत येऊन पक्षासोबत तडजोड होऊ शकेल, असा अंदाज वर्तवला जात होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरल्याची माहिती समोर येत आहे. थोड्याचवेळात याबाबत त्यांच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात येणार अशी शक्यता आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट’ असं या गटाचे नाव ठेवण्यात आल्याचं कळतंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला “शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे नाव न लावता जगून दाखवा” असे म्हटले होते. मात्र याच दरम्यान शिंदे गटाचे हे नवे नाव समोर येत आहे ज्यात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या दोन्हीं नावांचा समावेश आहे. त्यामुळे या नावावर कायदेशीररित्या करवाई करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Exit mobile version